नवी दिल्लीः झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या कटात अटक केलेल्या तीन आरोपींनी हे सरकार पाडण्याचे कारस्थान विदर्भातील भाजपच
नवी दिल्लीः झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या कटात अटक केलेल्या तीन आरोपींनी हे सरकार पाडण्याचे कारस्थान विदर्भातील भाजपचे दोन नेते माजी आमदार व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नगरसेवक चरण सिंह ठाकूर यांनी रचल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात झारखंडमधील सोरेन सरकारमधील तीन आमदार तीन आरोपींसोबत दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी बावनकुळे व ठाकूर या दोन भाजप नेत्यांची भेट घेतली होती, असे म्हटले आहे. पण हा आरोप बावनकुळे व ठाकूर यांनी फेटाळून लावला. आम्ही कधीही झारखंडमध्ये गेलेलो नाही व तेथील सरकार पाडण्याचाही विचार मनात आला नव्हता असे या दोघा नेत्यांनी म्हटले आहे.
बावनकुळे यांनी आपण साधे कार्यकर्ते असून सरकार पाडण्याएवढी आपली कुवत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
तर चरणसिंह ठाकूर यांनीही आपण काटोलमधील सामान्य व्यक्ती असून नगर परिषदेत एका पक्षाचा आपण नेता आहोत. आपण कटोलच्या बाहेर पडलेलो नाही, झारखंड अद्याप पाहिलेले देखील नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपचे राज्यातले प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही राज्य भाजप व नेत्यांवर लावलेले सर्व आरोप खोटे व निराधार असून या आरोपात तसूभरही सत्य नाही, असा दावा केला.
नेमके प्रकरण काय?
२२ जुलैला काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल यांनी सोरेन सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी २४ जुलैला तिघा जणांना अटक केली होती. अटक केलेल्या तिघांमधील अभिषेक दुबे झारखंडमधील एक ठेकेदार असून तर दुसरा आरोपी निवारण प्रसाद महतो याने २०२९मध्ये बोकारो येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. तिसरा आरोपी अमित सिंह याने आमदार खरेदीसाठी प्रयत्न केले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या तिघा आरोपींच्या जबानीत सोरेन सरकारमधील एकाही आमदाराचे नाव नाही.
या आरोपींच्या म्हणण्यानुसार १५ जुलैला सत्तारुढ सरकारमधील तीन आमदार व जयकुमार बेलखेडे हा मध्यस्थ रांचीहून दिल्लीकडे निघाले. तेथे ते चंद्रशेखर बावनकुळे व चरण सिंह ठाकुर यांना भेटले. हे तीन आमदार दिल्लीतल्या द्वारका हॉटेलमध्ये भाजपच्या ३ वरिष्ठ नेत्यांना १५ मिनिटे भेटले.
दुसर्या दिवशी १६ जुलैला तीन आमदारांनी एक कोटी रु.चा प्रस्ताव ठेवला होता. पण पैसे न मिळाल्याने ते दिल्लीहून रांचीला परत आले.
८१ सदस्य संख्या असलेल्या झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती आघाडी, काँग्रेस, राजद, राष्ट्रवादी व भाकपाचे मिळून ५१ आमदार आहेत. तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपचे २६ व अन्य पक्षांचे ४ आमदार आहेत.
मूळ बातमी
COMMENTS