नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ फडणवीस रस्त्यावर

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ फडणवीस रस्त्यावर

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी परस्पर विरोधी भूमिका मांडणारी आंदोलने झाली. पहिले आंदोलन ऑगस्ट क्रांती मैदानावर भ

मुस्लिम असल्याच्या संशयावरून वृद्धाचा कथित मारहाणीत मृत्यू
जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा?
काश्मीरात भाजप नेत्यांकडे अजूनही सरकारी निवासस्थाने

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी परस्पर विरोधी भूमिका मांडणारी आंदोलने झाली. पहिले आंदोलन ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजपच्या वतीने झाले तर आझाद मैदानावरील आंदोलनात चित्रपट, नाटकातील अभिनेत्यांशिवाय प्राध्यापक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व विद्यार्थी सामील झाले होते.

ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या भाजप पुरस्कृत आंदोलनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला सरकारचे जे रोखण्याचे प्रयत्न आहेत ते यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालतेय जाळपोळ करणाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली जाते पण आम्हाला शांततेत मोर्चा काढू दिला जात नाही असा आरोप करत फडणवीस यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी भाजपला रॅली काढण्यास परवानगी नाकारल्यानंतर नाराज झालेले अनेक भाजप कार्यकर्ते सरकारविरोधात घोषणा देत होते. ऑगस्ट क्रांती मैदानावर नंतर सर्व कार्यकर्ते जमा झाले. या मैदानावर उभ्या केलेल्या मंचावर सावरकर यांच्या जवळ छ. शाहु महाराज, भारतमाता व म. फुले यांच्या तसबिरी उभ्या केल्या होत्या. हा देश हिंदूंचा असून या नागरिकत्व कायद्यातून कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. आसाममध्ये एनआरसी असावा म्हणून राजीव गांधी यांनी आसाम करार केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तेथे एनआरसी लागू केले. या देशात तीन कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना या देशात आपण ठेवणार आहोत का असा सवालही त्यांनी केला.

फडणवीस यांनी आपले आंदोलन आझाद मैदानावर असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. प्रत्यक्ष भाजपचे आंदोलन ऑगस्ट क्रांती मैदानावर होणार होते. पण ही चूक उमगल्याने फडणवीस यांनी हे ट्विट काढून टाकले.

आझाद मैदानावरही निदर्शने

एकीकडे ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजपचे आंदोलन सुरू असताना आझाद मैदानावर प्रस्तावित एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात विद्यार्थी, बॉलीवूड अभिनेते व समाजातील विविध थरातील वर्गाने तीव्र निदर्शने केली. हा कायदा देशाच्या फाळणीला आमंत्रण देणारा, हिंदू-मुस्लीम ऐक्याला घातक ठरणारा, घटनेचा द्रोह असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांकडून दिली जात होती. या मोर्चाचे आयोजन ‘जॉइंट अक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस’च्या वतीने होते. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: