बनावट टूलकिटप्रकरणः पात्रा, रमणसिंहविरोधात गुन्हे

बनावट टूलकिटप्रकरणः पात्रा, रमणसिंहविरोधात गुन्हे

रायपूरः काँग्रेसचे टूलकिट म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिट प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण

राजस्थानच्या राज्यपालांचे राजभवनात ‘रामकथा’ आयोजन
धर्मांधतेवर स्थानिक मुद्द्यांनी मिळवलेला विजय
व्यवस्था बळकविण्याचा मोदी-शहा पॅटर्न

रायपूरः काँग्रेसचे टूलकिट म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिट प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या दोघांविरोधात राज्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश शर्मा यांनी रायपूर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी पात्रा व सिंह यांना चौकशीसाठीची नोटीस पाठवली आहे त्यानुसार या दोघांचा जबाब व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नोंद केला जाणार आहे.

रमण सिंह यांच्याकडील काँग्रेसच्या म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिटीची माहिती पोलिसांनी मागितली आहे. त्याच बरोबर त्यांना ‘एआयसीसी रिसर्च प्रोजेक्ट’ व ‘कॉर्नरिंग नरेंद्र मोदी अँड बीजेपी ऑन कोविड मॅनेजमेंट’ याचा दस्तावेज कुठून मिळाला अशी विचारणा पोलिसांनी नोटीसमध्ये केली आहे.

दरम्यान शनिवारी या टुलकिट प्रकरणात सिंह व पात्रा यांच्यावर गुन्हे नोंद झाल्यानंतर सिंह व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मुख्यालयात काही पदाधिकार्यांबरोबर धरणे धरले व आपल्याला अटक करावी अशी मागणी केली.

नेमके प्रकरण काय होते?

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या कथिट टूलकिटवरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात असून तो व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचा दावा भाजपने केला होता. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी भाजपच्या नेत्यांनी ज्यात संबित पात्राही होते त्यांनी काँग्रेसचे म्हणून एक बनावट टूलकिट ट्विटरवर प्रसिद्ध केले व काँग्रेसची भाजपला बदनाम करण्याची रणनीती पक्षात वरपासून खालीपर्यंत कशी कार्यान्वित केली जात आहे, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी काँग्रेसने हे टूलकिट भाजपच्याच आयटीसेलने तयार केले असून भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बी. एल. संतोष, संबित पात्रा व अन्य नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी भाजपच्या या नेत्यांविरोधात फिर्याद दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नेते व वकील अमन पवार यांनी म्हटले होते. काँग्रेसने ट्विटरलाही एक पत्र लिहून नड्डा, इराणी, पात्रा व अन्य नेत्यांची ट्विटर अकाउंट बनावट टूलकिट प्रसिद्ध केले म्हणून रद्द करावे अशी मागणी केली होती.

काँग्रेसचे नेते राजीव गौडा व पक्षाच्या सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात अफवा पसरवणे व बनावटगिरी करत असल्याचा आरोप करत या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करावे अशीही मागणीही तक्रारीत केली होती.

छत्तीसगडमध्ये संबित पात्रा व भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपने स्वतः हे बनावट टूलकिट तयार केले असून आपल्या नेत्याच्या खोट्या कथा पसरवून तयार केलेली प्रतिमा वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता भारताततल्या प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खराखुरा चेहरा समजून चुकला आहे, असा आरोप केला होता.

खेरा असेही म्हणाले होते की, या सरकारला कोणी प्रश्न विचारला तर त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न सत्तारुढ पक्षाकडून केले जातात. त्यांच्या अशा हातखंड्यावर लोक आता घाबरत नाही. आम्ही जनतेचा आवाज उठवत जाऊ व सरकारला कठीण प्रश्न विचारत जाऊ.

दरम्यान, संबित पात्रा यांना ट्विटरने समज देणे हे महत्त्वाचे आहे. कारण काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसद इमारतीत बेकायदा प्रवेश करून नासधुस केली होती, इमारतीला घेराव घातला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतले राजकीय वातावरण तापले होते. या हिंसेचे समर्थन करणारे ट्विट ट्रम्प यांनी केल्याने त्यांच्यावर ट्विटरने कारवाई केली होती.

अल्ट न्यूजचा पर्दाफाश

भाजपने प्रसिद्ध केलेले काँग्रेसचे टूलकिट खरे आहे की नाही याचा शोध अल्ट न्यूजने घेतला होता. त्यात काँग्रेस पक्षाचे एक बनावट लेटरहेड तयार करून त्याचे टुलकिट भाजपने तयार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा खळबळ माजली होती.

संबित पात्रांचे काय आरोप होते?

या कथित टुलकिट संदर्भात भाजपचे प्रवक्ते व नेते संबित पात्रा म्हणाले होते की, कोरोनाच्या महासाथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची व त्यांची बदनामी करण्याची संधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडली नाही. कोरोनाचा आढळलेला नवा प्रकार हा मोदी विषाणू असल्याचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे. त्यात काँग्रेस परदेशी पत्रकारांना हाताशी धरून भारताची बदनामीही करत आहेत. राहुल गांधी सकाळी उठून रोज ट्विट करतात, या ट्विटमधील माहिती या टुलकिटमधील असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला होता.

काँग्रेसचे अनेक नेते मोदींना पत्र लिहितात. कधी अध्यक्षा सोनिया गांधी तर कधी अन्य कोणी. हे सगळे ठरवून केले जात आहे आणि हे टुलकिटद्वारे होत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला होता.

हे टुलकिट काँग्रेसच्या नेत्या सौम्या वर्मा यांनी तयार केले असून त्या राजीव गौडा यांच्या कार्यालयात काम करत असल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता.

काँग्रेसने कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याचा प्रचार करत ईद व कुंभ यांची तुलना करून धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. कुंभला बदनाम करणे पण ईदवर कोणतीही प्रतिक्रिया न देणे असा काँग्रेसचा दुषित दृष्टिकोन आहे, असाही आरोप पात्रा यांनी केला होता.

पात्रा यांच्या आरोपाला भाजपच्या अनेक नेत्यांना पाठिंबा दिला होता. त्यात नड्डा, इराणी, बीएल संतोष या नेत्यांव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री पियूष गोयल, हरदीप सिंह पुरी, किरन रिजिजू, अनुराग ठाकूर, प्रल्हाद जोशी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह, राज्यवर्धन राठोड, तेजस्वी सूर्या, पीसी मोहन, मनोज कोटक, विनय सहस्त्रबुद्धे आदी खासदारही सामील होते.

ट्विटरचा पात्रां यांना दणका

एकीकडे भाजप व काँग्रेसमध्ये टूलकिट प्रकरणावरून वातावरण तापले असताना गेल्या शुक्रवारी कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ‘कोविड-१९ टुलकिट’च्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचा भाजपचा प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप ट्विटरने फेटाळला. पात्रा यांनी काँग्रेसचे म्हणून सादर केलेले टूलकिट हे तथ्यामध्ये मोडतोड करून प्रसिद्ध केले गेले आहे, त्यामुळे पात्रा यांचे कथित ट्विट ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत आपण समाविष्ट करत असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले होते.

ट्विटरची ही भूमिका भाजपच्या आयटीसेलला एक चपराक समजली जात आहे. खोट्या बातम्या पसरवणे व बनावट तथ्ये उभी करून देशात ध्रुवीकरण करण्याचा व देशातल्या काँग्रेससह विरोधीपक्षांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवण्याचे आरोप या पूर्वी भाजपच्या आयटीसेलवर झाले आहेत. पण ट्विटरने आजपर्यंत एवढी कडक भूमिका घेतलेली दिसून आलेली नव्हती.

ट्विटरने संबित पात्रा यांनी काँग्रेसचे म्हणून दावा केलेले टूलकिट खोटे, बनावट व तथ्यामध्ये मोडतोड करून ते ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करणे हा जनतेमध्ये भ्रम फैलावण्याचा व अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.

पात्रा यांच्याबरोबर फेसबुकवर सक्रीय असलेल्या शेफाली वैद्य यांच्या ट्विटलाही ट्विटरने ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत समाविष्ट केले होते.

ट्विटरच्या अशा अनपेक्षित कारवाईमुळे गडबडलेल्या केंद्र सरकारने जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत ट्विटरने ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ ही श्रेणी मागे घ्यावी असे ट्विटरला सांगितले होते. ट्विटरने या प्रकरणाच्या चौकशीत लक्ष घालू नये असेही सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी खात्याने म्हटले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0