सरकारचे शेतकर्यांना उत्तरः ‘चेंडू तुमच्या कोर्टात’

सरकारचे शेतकर्यांना उत्तरः ‘चेंडू तुमच्या कोर्टात’

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या ३ वादग्रस्त शेती कायद्यांवरून शेतकरी संघटना व सरकारमधील ११ वी बैठकही निष्फळ ठरली. त्यानंतर कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे, आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न केले अशी प्रतिक्रिया दिली. तर शेतकरी नेत्यांनी सरकारकडून या कायद्यांवर समाधानकारक पावले उचलली जात नाही. सरकार तेच ते मुद्दे पुन्हा रेटत आहेत, असा आरोप केला.

शुक्रवारच्या बैठकीत किमान शेतीभाव विषयावर समिती नेमण्याचा प्रस्ताव सरकारने शेतकरी संघटनांपुढे ठेवला. पण हा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी लगेचच फेटाळला. समिती ठरवेल त्यावरच सरकार सहमत होईल असेही सांगता येत नाही. आम्ही हे तिन्ही कायदे शेतकर्यासाठी विनाशकारी असल्याचे सांगत आहोत पण सरकार त्यात दुरुस्त्या आणू इच्छिते, त्यामुळे सरकारची ही भूमिकाच पसंत नाही, असे शेतकरी नेते राजेंद्र सिंग नेकहा यांनी सांगितले.

 

मूळ बातमी

COMMENTS