नवी दिल्लीः भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर गुरुवारी अमेरिकेच्या प्रशासनाने प्रतिक्रिया व्यक्त करताना शांततापूर्ण आंदोलने ही लोकशाही जिवंत असल्य
नवी दिल्लीः भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर गुरुवारी अमेरिकेच्या प्रशासनाने प्रतिक्रिया व्यक्त करताना शांततापूर्ण आंदोलने ही लोकशाही जिवंत असल्याची लक्षण असतात, असे मत व्यक्त केले होते. या मतावर शुक्रवारी भारतीय परराष्ट्र खात्याने प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेली घटना अमेरिकेत कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये जो हिंसाचार झाला त्या प्रकारची होती असे उत्तर अजब दिले.
अमेरिकेने भारताच्या पावलांचे समर्थन करताना त्यामुळे भारतीय बाजारपेठ सक्षम होईल, त्यामध्ये व्यापक प्रमाणात गुंतवणूक होईल असे मत व्यक्त केले होते. हे मत भारताने शेती सुधारणांच्या दिशेने सरकारच्या पावलांचे अमेरिकेने समर्थन केले असा घेतला होता. पण अमेरिकेने शांततापूर्ण आंदोलने व इंटरनेटवरचे निर्बंध हा मुद्दा उपस्थित करत हे हक्क देणे लोकशाहीच्या यशाचे वैशिष्ट्य असल्याचे म्हटले होते.
शुक्रवारी परराष्ट्र खात्याचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर ज्या प्रकारचा उद्रेक दिसून आला, तोडफोड झाली ती घटना ६ जानेवारी रोजी अमेरिकेत झालेल्या कॅपिटॉल हिल घटनेसारखी होती. भारत झालेल्या घटनांवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेने व्यक्त केलेल्या मताची दखल भारताने घेतली असून त्यांनी ज्या दृष्टिकोनातून आपले मत व्यक्त केले त्याला त्याच दृष्टिकोनातून जाणून घेण्याची गरज आहे, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS