गोहाटीः आसामच्या राजकारणात ५ दशकाहून अधिक काळ सक्रीय असलेले आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे सोमवारी निधन झाले होते.
गोहाटीः आसामच्या राजकारणात ५ दशकाहून अधिक काळ सक्रीय असलेले आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे सोमवारी निधन झाले होते. ते ८४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याने ते रुग्णालयात होते. ते नंतर बरे झाले पण त्यांच्या प्रकृतीत अन्य समस्या निर्माण झाल्याने ते अत्यवस्थ होते. २१ नोव्हेंबरला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
गोगोई यांचा जन्म १९३६मध्ये झाला. १९७६मध्ये इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीत सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. आणि २००१ पासून सलग तीन वेळा (१५ वर्षे) त्यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
सुमारे ५० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात गोगोई यांनी काँग्रेस पक्ष, केंद्र सरकार व आसाममध्ये अनेक पदे भूषवली होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना ते १९८५ ते १९९०दरम्यान ते काँग्रेसचे महासचिव होते. नंतर नरसिंह राव सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते.
मूळ बातमी
COMMENTS