राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन

राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन

महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आज संध्याकाळी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाराष्ट्र विकास आघाडीचे संयुक्त सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दिव्यांगांना कोरोना तपासणी, लसीकरणात प्राधान्य
आकळण्यापलीकडच्या लीलाताई…
राष्ट्रवादीची अनिल देशमुख यांना क्लीनचिट

राज्याचे २९ वे मंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांनी शपथ घेतली.

उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शपथ घेतली. छगन भुजबळ यांनी छाप्त्राप्ती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा आणि सावित्रीबाई फुले यांना स्मरून शपथ घेतली. जयंत पाटील यांनी शरद पवार यांना वंदन करून शपथ घेतली. त्यांनी आवर्जून आपल्या आईचे नाव घेतले. बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांना स्मरून शपथ घेतली. डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आणि सोनिया व राहुल गांधी यांना स्मरून शपथ घेतली. त्यांनी आपल्या आईचे आवर्जून नाव घेतले.

दादरला शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डीएमकेचे एम. के. स्टालिन, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, अभिषेक मनु शिंगवी, मनसे प्रमुख राज ठाकरे., माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. नीता अंबानी उपस्थित होत्या. यावेळी तिनही पक्षाचे मिळून सुमारे ४० हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0