निर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी

निर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची दयेची याचिका बुधवारी राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर पतियाळा हाऊन न्यायालयाने चारही दोष

१ रु.दंड भरला, पण निर्णय अमान्यचः भूषण
शबरीमला प्रकरण आणखी मोठ्या खंडपीठाकडे
मोदी वैश्विक विचासरणी मांडणारे दूरदृष्टीचे नेते – न्या. मिश्रा

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची दयेची याचिका बुधवारी राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर पतियाळा हाऊन न्यायालयाने चारही दोषींना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फाशी दिली जावी, असे आदेश तिहार कारागृह प्रशासनाला दिले. दोषींची नावे अक्षय ठाकूर, विनय शर्मा, मुकेश सिंग व पवन गुप्ता अशी आहेत.

पतियाळा हाऊस न्यायालयाने फाशीची तारीख जाहीर केल्याने दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी पुन्हा आमच्याकडे कायदेशीर पर्याय आहेत, असा दावा केला. त्यांनी फाशीची शिक्षा ही न्यायिक हत्या आहे, ती मीडियाच्या दबावाखाली देण्यात आल्याचा आरोपही केला. चारही आरोपींच्या विरोधात यापूर्वी तीनवेळा डेथ वॉरंट बजावले होते. आता त्यांना किती वेळा फासावर चढवणार असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणातील दोषी दहशतवादी नाहीत त्यांचे तुरुंगात शिकून परिवर्तन होऊ शकते, तुमच्या दबावामुळे त्यांना फाशी सुनावली जात आहे, असे ए. पी. सिंह प्रसार माध्यम प्रतिनिधींना उद्देशून म्हणत होते.

दरम्यान निर्भयाच्या आईने न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, एक ना एक दिवस दोषींना फासावर जावे लागेल. ते दोषी फासावर गेल्यानंतर माझा विजय होईल, असे त्या म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0