नवी दिल्लीः ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर ०.४ टक्क्याने वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने शुक्रवारी दिली. कोविड-१९च
नवी दिल्लीः ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर ०.४ टक्क्याने वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने शुक्रवारी दिली. कोविड-१९च्या महासाथीमुळे पूर्ण मंदीत गेलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची ही चिन्हे आहेत. सणासुदीच्या दिवसांतील बाजारपेठेतील वाढलेली मागणी व सरकारचा वाढता खर्च यामुळे अर्थव्यवस्थेत हे सुधार दिसू लागले आहेत.
गेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था ७.३ टक्क्याने घसरली होती. ही घसरण ऐतिहासिक होती. ही पार्श्वभूमी पाहता ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीतील सुधारणा अत्यंत आशादायक आहे.
सांख्यिकी आयोगाने २०२०-२१ या आर्थिक वर्षांत विकासदर -८ टक्के इतका राहील असेही सांगितले आहे. २०१९-२०मध्ये हा दर ४ टक्के होता.
तिसर्या तिमाहीतील विकासदर हा अंदाजित विकास दराच्या तुलनेत कमी वधारला असला तरी ही वाढ आशादायक असल्याचे मत एचडीएफसीचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले. देशाची एकूण अर्थव्यवस्था पूर्वपदावर या वर्षाअखेर येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS