गॅस सिलेंडरच्या दरात २५ रु.ची वाढ

गॅस सिलेंडरच्या दरात २५ रु.ची वाढ

नवी दिल्लीः पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गुरुवारी केंद्र सरकारने सर्व श्रेणींमधील एलपीजी सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढवले. सरकारचा हा निर्णय अनु

घरगुती सिलेंडरच्या दरात १५ रु.नी वाढ
घरगुती सिलेंडरचा दर हजार रुपयाच्या वर
४ दिवसांत पुन्हा २५ रु.ची गॅस दरवाढ

नवी दिल्लीः पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गुरुवारी केंद्र सरकारने सर्व श्रेणींमधील एलपीजी सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढवले.

सरकारचा हा निर्णय अनुदानित व विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलेंडर ग्राहकांना लागू असल्याने या लाखो ग्राहकांना ही दरवाढ सोसावी लागणार आहे. या दरवाढीत उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणार्या स्वयंपाक गॅस सिलेंडरचाही समावेश आहे.

या महिन्यातली गॅस सिलेंडरमधील ही तिसरी दरवाढ आहे. या अगोदर ४ फेब्रुवारीला २५ रु.ची दरवाढ झाली होती नंतर १५ फेब्रुवारीला ५० रु.ची दरवाढ करण्यात आली होती. गेल्या डिसेंबरपासून ही दरवाढ होत असून ती आतापर्यंत १५० रु.नी वाढली आहे.

या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये स्वयंपाकाचा १४.२ किलो ग्रॅम गॅस सिलेंडरचा दर ७६९ रु.वरून ७९४ रु. इतका झाला आहे.

दरम्यान २५ रु.च्या दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकार हे जनतेच्याविरोधात असल्याचा आरोप केला आहे. सरकारने या दरवाढीतून सामान्य गरीब कुटुंबानाही सोडले नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0