गूगलची ‘रिमूव्ह चायना अॅप’वर कारवाई

गूगलची ‘रिमूव्ह चायना अॅप’वर कारवाई

नवी दिल्ली : आपल्या कंपनीचे काही नियम भंग केल्याप्रकरणी अल्फाबेट इनकॉर्पोरेशनच्या गूगल या कंपनीने आपल्या अॅप स्टोअरवरून भारतीय कंपनीचे ‘रिमूव्ह चायना

‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक
पबजीसह ११८ चिनी अॅपवर बंदी
शिक्षक, विद्यार्थ्यांच्या हजेरीची नोंद ॲपद्वारे

नवी दिल्ली : आपल्या कंपनीचे काही नियम भंग केल्याप्रकरणी अल्फाबेट इनकॉर्पोरेशनच्या गूगल या कंपनीने आपल्या अॅप स्टोअरवरून भारतीय कंपनीचे ‘रिमूव्ह चायना ऍप्स’ हे अॅप काढून टाकले आहे. कोरोना विषाणूचे महासंकट चीनमधून आल्याने व भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर चीनची आर्थिक कोंडी करण्याच्या हेतूने भारतातील सर्व मोबाइल ग्राहकांनी त्यांच्या मोबाइलमधून चिनी कंपन्यांची सर्व अॅप्स काढून टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले होते.

हे चिनी मोबाइल अॅप काढून टाकण्यासाठी एका भारतीय कंपनीने ‘रिमूव्ह चायना अॅप्स’ हे गूगलच्या प्ले स्टोरवर आणले होते. हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर सर्व चिनी अॅप्स काढून टाकता येतात असा कंपनीचा दावा होता. त्यामुळे देशभरात किमान ५० लाख ग्राहकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये ‘रिमूव्ह चायना अॅप्स’ डाऊनलोड केले होते.

पण ‘रिमूव्ह चायना अॅप्स’ने आमच्या कंपनीच्या नियमांची पायमल्ली केल्याने हे अॅप गूगल प्ले स्टोरवरून काढून टाकण्यात येत आहे, असा मर्यादित खुलासा गूगलच्या प्रवक्याने केला. त्यांनी अन्य कोणतीही अतिरिक्त माहिती दिली नसल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

‘रिमूव्ह चायना अॅप्स’ मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तो बाइटडान्स, टिकटॉक व अलिबाबाचे यूसी ब्राउझर अशा अॅपचे स्कॅन करत होता आणि ही अॅप काढून टाकल्यानंतर ‘यू आर ऑसम, नो चायना अॅप फाऊंड’ असा मेसेज मोबाइलधारकाला मिळत होता.

‘रिमूव्ह चायना अॅप्स’हे ‘वनटच अॅपलॅब्ज’ या कंपनीने तयार केले होते पण त्यांनी गूगलच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या वेबसाइटवर ‘रिमूव्ह चायना अॅप्स’ गूगल अॅप स्टोरवरून काढून टाकल्याची कबुली देण्यात आली आहे. त्याचबरोबर आपले अॅप डाऊनलोड केल्याबद्दल भारतीय ग्राहकांचे आभार मानले आहेत.

सत्ताधारी भाजपने चीनला विरोध म्हणून #BoycottChineseProducts ही मोहीम सोशल मीडियात चालवली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0