नवी दिल्ली: सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या ना-नफा तत्त्वावरील स्वायत्त थिंक टँकच्या नवी दिल्लीतील कार्यालयावर सध्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी छापा
नवी दिल्ली: सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या ना-नफा तत्त्वावरील स्वायत्त थिंक टँकच्या नवी दिल्लीतील कार्यालयावर सध्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी छापा घातला. त्याच बरोबर एनजीओ ऑक्सफॅमवरही छापा टाकला.
हरयाणा, महाराष्ट्र व गुजरातमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी घालण्यात आलेल्या छाप्यांशी ही कारवाई संबंधित आहे, असे प्राप्तिकर खात्यातील स्रोतांनी सांगितल्याचे एनडीटीव्हीच्या बातमीत म्हटले आहे.
२०हून अधिक नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या निधीवरून ही कारवाई केली जात असल्याचे समजते.
प्राप्तिकर विभागातील अधिकारी मंगळवार दुपारपासून सीपीआरच्या लेखापुस्तिका तपासत आहेत, असेही बातमीत म्हटले आहे.
१९७३ मध्ये स्थापन झालेल्या सीपीआरचे एक उद्दिष्ट ‘भारतातील महत्त्वाच्या धोरणात्मक आव्हानांवर सुसंबद्ध प्रश्न उपस्थित करणे व पुरावा विकसित करणे’ हे आहे.
सध्या सीपीआरच्या चेअरमन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक व राज्यशास्त्रज्ञ मीनाक्षी गोपीनाथ आहेत. यामिनी अय्यर या सीपीआरच्या अध्यक्ष व चीफ एग्झिक्युटिव आहेत.
मंडळाच्या अन्य सदस्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन, आयआयएम अहमदाबादमधील प्राध्यापक रमा बिजापूरकर आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील श्याम दिवाण यांचा समावेश आहे.
टीप: या बातमीशी संबंधित ताज्या घडामोडी हाती येण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जी ताजी माहिती हाती येईल, ती बातमीमध्ये समाविष्ट केली जाईल.
COMMENTS