नॅशनल हेराल्ड प्रकरणी १२ ठिकाणी ईडीच्या धाडी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी १२ ठिकाणी ईडीच्या धाडी

नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने मंगळवारी दिल्लीत विविध १२ ठिकाणी छापे टाकले. एक छापा बहादूर शहा जफर मार्गावरील नॅशनल हेराल्डच्या मुख्य कार्याल

‘भारतात लोकशाही नव्हे, अधिकारशाही’
तृणमूलमध्ये यशवंत सिन्हांच्या प्रवेशाने काय साध्य होईल?
देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने मंगळवारी दिल्लीत विविध १२ ठिकाणी छापे टाकले. एक छापा बहादूर शहा जफर मार्गावरील नॅशनल हेराल्डच्या मुख्य कार्यालयावरही टाकला. या छाप्यात नॅशनल हेराल्डची काही संपत्ती ईडीने ताब्यात घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही धाड मनी लाँडरिंगच्या पीएमएलए कायद्यांतर्गत अधिक पुरावे मिळवण्यासाठी घालण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची कसून चौकशी केली होती. हे दोघे नॅशनल हेराल्डच्या संचालक मंडळातील सदस्य आहेत.

दरम्यान या धाडी टाकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. भाजपचे हे सूडाचे राजकारण असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी सरकारचे हे सूडाचे राजकारण असून तुम्ही आमचा आवाज बंद करू शकत नाही, असा इशारा दिला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0