नवी दिल्लीः २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) आर्थिक विकासाचा दर १३.५ टक्के इतका होता, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगान
नवी दिल्लीः २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) आर्थिक विकासाचा दर १३.५ टक्के इतका होता, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने दिली आहे. तर जानेवारी ते मार्च २२ या शेवटच्या तिमाहीत आर्थिक विकास दर ४.१ टक्के होता असे सांख्यिकी आयोगाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासात २०.१ टक्क्याने वाढ झालेली होती. अर्थविश्लेषकांच्या मते हा आर्थिक विकास दर पुढेही दोन अंकीही जाऊ शकतो. ही वाढ ‘बेस इफेक्ट’ मुळे असून इक्रा या रेटिंग एजन्सीने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक विकासदर १३ टक्के होईल तर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अहवालात आर्थिक विकासदर १५.७ टक्के इतका होईल, असा अंदाज वर्तवला होता.
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने आर्थिक विकासदराचा अंदाज १६.२ टक्के इतका वर्तवला होता.
दरम्यान केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याने ८ उद्योगांची आकडेवारी जारी केली असून त्यात कोळसा उत्पादन (११.४ टक्क्याने वाढ), कच्च्या तेलाचे उत्पादन ( ३.८ टक्क्याने कमी), नैसर्गिक वायू उत्पादन (०.३ टक्क्याने कमी), रिफायनरी उत्पादने (६.२ टक्के वाढ), खत उत्पादन (६.२ टक्क्याने वाढ), पोलाद उत्पादन (५.७ टक्के वाढ), सिमेंट उत्पादन (२.१ टक्के वाढ), वीज उत्पादन २.२ टक्क्याने वाढल्याचे म्हटले आहे.
तर देशाची एकूण वित्तीय तुटीची टक्केवारी २०.५ टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २१.३ टक्के इतका होता.
एप्रिल ते जुलै २२ या काळात एकूण वित्तीय तूट ३,४०,८३१ कोटी रु. इतकी होती.
चीनचा एप्रिल ते जून २०२२ या तिमाहीतील वृद्धीदर ०.४ टक्के इतका आहे.
मूळ बातमी
COMMENTS