नवी दिल्लीः कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडियाची जेवढी काही थकबाकी असेल ती लवकर चुकवावी असे आदेश केंद्र सरकारने बुधवारी सर्व मंत्रालय व खात्यांना दिले आहेत. त्याच बरोबर या पुढे रोख पैसे भरून तिकिटे खरेदी करावी असेही निर्देश केंद्राने सर्व खात्यांना दिले आहेत.
या महिन्याच्या सुरूवातीला केंद्र सरकारने १८ हजार कोटी रु.मध्ये एअर इंडिया कंपनी टाटा समुहातील कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर या कंपनीवरचे कर्ज चुकवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
सरकारच्या अनेक खात्यांची एअर इंडियाकडे थकबाकी आहेत. विविध खात्यांमधील वरिष्ठ अधिकार्यांचे देशांतर्गत व परदेशी विमान दौरे यांचा खर्च एअर इंडियाला चुकता केलेला नाही. आता केंद्र सरकारने या पुढील अधिकार्यांच्या दौरे एअर इंडियाला रोख रक्कम भरून करावेत असे आदेश दिले आहेत.
२५ ऑक्टोबरला केंद्र सरकारने एअर इंडियाच्या विक्री संदर्भात टाटा सन्ससोबत शेअर खरेदी करारावर स्वाक्षर्या केल्या. आता डिसेंबर अखेर एअर इंडिया कंपनी आपल्याकडे सुपूर्द अशी मागणी टाटा कंपनी सरकारकडे मागेल.
सध्या ‘एअर इंडिया’वर ६०,०७४ कोटी रु.चे कर्ज असून टाटा सन्सला यापैकी केवळ २३ हजार कोटी रु.चे कर्ज फेडायचे आहे.
मूळ बातमी
COMMENTS