भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील वृद्धीत लक्षणीय घट

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील वृद्धीत लक्षणीय घट

या वर्षी १७ एप्रिल रोजी अपुऱ्या निधीमुळे जेट एअरवेजने आपली सेवा बंद केली.

पाकिस्तानमुळे भारतीय विमानकंपन्यांना ५४९ कोटींचा तोटा
एअर इंडियावर अखेर टाटांची मालकी
एअर इंडिया विकण्यास मंजुरी

भारताची हवाई वाहतुकीमध्ये या वर्षी ऑगस्टमधील ४.५% वृद्धीच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात केवळ १.६% इतकीच वृद्धी झाली, असे जागतिक एअरलाईन्स संघटना IATA ने सांगितले. संपूर्ण २०१९ मध्ये आर्थिक उलाढाल कमी असल्यामुळे आणि जेट एअरलाईन्सच्या दिवाळखोरीमुळे वाढीचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचेही त्यांनी म्हटले.

मागच्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत देशांतर्गत RPK (Revenue Passenger Kilometres) मधील वृद्धी ऑगस्टमधील ४.५% पासून १.६% इतकी कमी झाली, असे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.

त्या तुलनेत, चीनमधील प्रवासी वाहतूक सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये अनुक्रमे ८.९% आणि ९.८% ने वाढली, असेही IATA ने म्हटले आहे.

RPK हे प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीचे एक मोजमाप आहे, जे प्रवाशांची संख्या आणि त्यांनी प्रवास केलेल्या किलोमीटरची संख्या यांचा गुणाकार करून मोजले जाते. वर नमूद केलेल्या मासिक प्रवासी वाहतुकीचे आकडे मागच्या वर्षातील त्याच महिन्याच्या वाहतुकीच्या आकड्यांच्या तुलनेत आहेत.

२०१५ ते २०१८ या दरम्यानची वृद्धी वर्षातील त्याच कालावधींची तुलना केली असता दुहेरी आकड्यांमध्ये होती. मात्र पूर्ण २०१९ मध्ये आर्थिक उलाढाल कमी होणे, खाजगी वापर कमी होणे आणि जेट एअरवेजची दिवाळखोरी यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या काळातच बाजारपेठेवर परिणाम झाला, भारतीय विमानवाहतूक बाजारपेठेबद्दल बोलताना IATA ने म्हटले.

जेट एअरवेजने आपले कामकाज या वर्षी १७ एप्रिलला अपुऱ्या निधीमुळे बंद केले.

IATA हे २९० एअरलाईनचे, व ८२% जागतिक हवाई वाहतुकीचे प्रतिनिधित्व करते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0