यूट्यूबवरील १८ भारतीय, ४ पाकिस्तानी चॅनेल बंद करण्याचे आदेश

यूट्यूबवरील १८ भारतीय, ४ पाकिस्तानी चॅनेल बंद करण्याचे आदेश

नवी दिल्लीः यूट्यूब या सामाजिक माध्यमावरील २२ बातम्या देणारी चॅनेल बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने दिले आहेत. या २२ चॅनेलमधील ४ च

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला; निकाल २१ जुलै रोजी
सेंट्रल व्हिस्टा रोखण्यास न्यायालयाचा नकार
गांधी का मरत नाही : गांधींवरची कोळीष्टकं दूर करण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीः यूट्यूब या सामाजिक माध्यमावरील २२ बातम्या देणारी चॅनेल बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने दिले आहेत. या २२ चॅनेलमधील ४ चॅनेल पाकिस्तानचे असून या सर्व चॅनेलवरून खोट्या बातम्या, अफवा पसरवली जात असून ते देशाची सुरक्षितता, एकता, सार्वजनिक व्यवस्था व परदेशी संबंधांवर परिणाम करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या २२ चॅनेलव्यतिरिक्त तीन ट्विटर अकाउंट, एक फेसबुक अकाउंट व एक बातमी देणारी वेबसाइटही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात माहिती तंत्रज्ञान नियमावली २०२१च्या अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर यू ट्यूबवरील भारतीय चॅनेलवर बंदी घालण्याचा हा पहिलाच आदेश आहे.

ज्या चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे त्यातील चॅनेलकडून काही टीव्ही न्यूज चॅनेलचे टेम्पलेट व वृत्तसमालोचकांच्या चेहऱ्यांची नक्कल केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अशी नक्कल करून प्रेक्षकांना आपली बातमी खरी आहे असे दर्शवणे व मुळात खोटी माहिती देणे हा त्यांचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बंद केलेल्या चॅनेलची प्रेक्षक संख्या २६० कोटींपेक्षा अधिक असून या चॅनेलच्या माध्यमातून भारतीय सैन्य दल, काश्मीर विषयावर बनावट, खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0