पर्यावरणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदाराचा राजीनामा

पर्यावरणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदाराचा राजीनामा

भरुचः माजी केंद्रीय मंत्री व भरूच येथील भाजपचे विद्यमान खासदार मनसुख वसावा यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते आपल्या लोकसभा सदस्यत्

सोरेन शपथविधी : विरोधी पक्ष एकवटले
‘रफालवरील निकाल चौकशीचे सूतोवाच करणारा’
भाजप आमदार म्हणाले- बिल्कीस प्रकरणातील दोषी चांगले संस्कार असलेले ब्राह्मण

भरुचः माजी केंद्रीय मंत्री व भरूच येथील भाजपचे विद्यमान खासदार मनसुख वसावा यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामाही संसदेच्या आगामी अधिवेशनात देणार आहेत.

गेल्या आठवड्यात वसावा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून पर्यावरण मंत्रालयाने अध्यादेशाद्वारे जाहीर केली होती, ती अधिसूचना स्थानिक आदिवासींच्या हितासाठी मागे घ्यावी अशी विनंती घेतली होती. आदिवासींची गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित केल्यानंतर सरकारने या आदिवासींच्या जमिनी व संपत्ती ताब्यात घेण्यास सुरूवात केल्याने आदिवासींमध्ये भय व अविश्वास निर्माण झाला आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. या आदिवासींना स्थानिक अन्य लोकांसमवेत सामावून घ्यावे त्यामुळे त्यांच्या जगण्यात शांतता व स्थैर्य येईल असाही पत्रात वसावा यांनी आग्रह केला होता.

वसावा यांचा राजीनामा अशा परिस्थितीत आला आहे की येत्या काही महिन्यात गुजरातमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत असून त्यामध्ये नर्मदा जिल्ह्यातील संवेदनशील असे शूल्पणेश्वर अभयारण्यातील १२१ गावे सामील आहेत. या गावांमधील आदिवासी केंद्राच्या अधिसूचनेविरोधात आंदोलन करत आहेत.

वसावा यांनी पक्षाला लिहिलेल्या पत्रात, माझ्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये अशा अपेक्षेने राजीनामा देत असून पक्षाने माझ्या क्षमतेपेक्षा अधिक संधी दिली आहे, त्यासाठी पक्षाचा आभारी आहे. माणसाकडून चुका होतात व माणसे चुका करतात, त्याचा तोटा पक्षाला होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता असून मला माफ करावे, अशी विनंती केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1