सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती

सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती

मुंबई : नागरिक दुरुस्ती कायद्याला माझा पाठिंबा आहे, असे विद्यार्थ्यांकडून एका पोस्टकार्डवर लिहून घेणाऱ्या अहमदाबादमधील एका खासगी शाळेच्या निर्णयाला पा

एनआरसी गरजेचे; सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
सीएएविरोधात मध्य प्रदेश विधानसभेत प्रस्ताव मंजूर
सीएएविरोधातील नाटक देशद्रोह नव्हे : कर्नाटक न्यायालय

मुंबई : नागरिक दुरुस्ती कायद्याला माझा पाठिंबा आहे, असे विद्यार्थ्यांकडून एका पोस्टकार्डवर लिहून घेणाऱ्या अहमदाबादमधील एका खासगी शाळेच्या निर्णयाला पालकांनी हरकत घेतल्याने त्या शाळेने माफी मागितली आहे.

या शाळेचे नाव ‘लिटिल स्टार स्कूल’ असे असून या शाळेने पाचवी ते दहावीतील सर्व मुलांकडून “Congratulations. I, a citizen of India, congratulate honourable Prime Minister Shri Narendra Modi for CAA (Citizenship Amendment Act). I and my family support this act.” असा संदेश सक्तीने लिहून घेतला. ही शाळा गुजरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाशी संलग्न असून तिने एकच संदेश सर्व विद्यार्थ्यांना लिहायला लावला. ही सर्व पत्रे पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार होती व तसा पत्ता “PMO, South Block secretariat building, Raisina Hills, New Delhi” हा प्रत्येक पत्रावर लिहिण्यात आला होता.

या पत्राबाबतची माहिती पालकांपर्यंत पोहचल्यानंतर काही पालकांनी आमच्या मुलांना लहानपणापासून राजकीयदृष्ट्या प्रेरित केले जात असल्याबद्दल शाळा व्यवस्थापनेकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर हा प्रकार गैरसमजातून घडून आला अशी सारवासारव शाळा प्रशासनाने केली व हा विषय मिटवण्याचे प्रयत्न केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0