बशीरची ११ वर्षानंतर निर्दोष सुटका

बशीरची ११ वर्षानंतर निर्दोष सुटका

श्रीनगर/वडोदरा: गुजरात पोलिसांद्वारा दहशतवाद कारवायांच्या आरोपाखाली (यूएपीए) गेली ११ वर्षे तुरुंगात खितपत पडलेले काश्मीरमधील संगणक व्यावसायिक बशीर अहम

उद्योग अग्रणीचे निधन !
राज्याच्या संमतीविना ‘आयएएस’ना केंद्रात घेण्याचा प्रस्ताव
भूषण यांना दोषी ठरवणाऱ्या निकालपत्रातील ठळक मुद्दे

श्रीनगर/वडोदरा: गुजरात पोलिसांद्वारा दहशतवाद कारवायांच्या आरोपाखाली (यूएपीए) गेली ११ वर्षे तुरुंगात खितपत पडलेले काश्मीरमधील संगणक व्यावसायिक बशीर अहमद बाबा यांची आरोप सिद्ध न झाल्याने आणंद येथील स्थानिक न्यायालयाने यांची सुटका केली. या सुटकेनंतर २३ जूनला बशीर बाबा श्रीनगरनजीक रैनावाडी येथे आपल्या घरी पोहोचले.

१३ मार्च २०१०मध्ये गुजरात एटीएसने बाबा यांना आणंद येथे अटक केली होती. अटक करताना बाबा यांच्यावर दहशतवाद्यांचे जाळे तयार करणे, २००२च्या गुजरात दंगलीत नाराज मुस्लिम तरुणांना हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मदत करणे असे आरोप लावले होते.

बाबा यांनी फोन व ईमेलद्वारे हिजबुलचा प्रमुख सैयद सलाउद्दीन व बिलाल अहमद शेरा यांच्याशी संपर्क केल्याचाही गुजरात पोलिसांचा आरोप होता.

आणंद जिल्हा न्यायालयाने बाबा यांची सुटका करताना गुजरात पोलिस आरोपीविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध करू शकलेले नाहीत, असा ठपका ठेवला.

आरोपी बाबा १३ मार्च २०१०मध्ये आणंदमध्ये आढळला. तो दहशतवाद्यांचे एक नेटवर्क तयार करत होता, त्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत होती, शिवाय आरोपीचा संपर्क हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरशी होता, असे अनेक आरोप पोलिस सिद्ध करू शकले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.

सुटका झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी दूरध्वनीवरून बोलताना बाबा यांनी सांगितले की, २०१०मध्ये ते गुजरातमध्ये एका एनजीओचे प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहात होते. ही एनजीओ ओठ फाटलेल्या मुलांना मदत करणारी असून त्या वर्षी ते १५ दिवसांचे प्रशिक्षण काम आटपून घरी जात असताना त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले. श्रीनगरमधील एका डॉक्टराने काश्मीर खोर्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी संस्था स्थापन केली होती. या संस्थेसाठी बाबा यांनी गुजरातमध्ये प्रशिक्षण घ्यावे अशी विनंती केली. आणि बाबा यांचे २८ फेब्रुवारी २०१०मध्ये विमानांच्या तिकिटांचेही बुकिंग झाले होते. पण बाबा यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. टीव्ही कॅमेर्यांसमोर त्यांची परेड केली व त्यांना हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी म्हणून घोषित केले.

आपल्या कारवाईचे समर्थन करताना गुजरात पोलिसांनी बाबा यांच्या लॅपटॉपमध्ये हिजबुल मुजाहिदीनला ईमेल पाठवल्याचा पुरावा मिळाला असे सांगितले होते. त्याच बरोबर प्रशिक्षण शिबिरादरम्यान बाबा फोन कॉल करण्यासाठी अनेकदा बाहेर जात होते. त्यांचे फोन संशयास्पद होते, असे पोलिसांचे आरोप होते.

बाबा यांची तुरुंगात मास्टर्स डिग्री

सुमारे ११ वर्षांच्या तुरुंगवासात बाबा यांनी राजकारण व लोकप्रशासन या विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. श्रीनगरमध्ये आपल्या घरी पोहोचल्यावर त्यांनी आपल्याला अत्यंत आनंद झाल्याचे सांगितले. मी निर्दोष होतो, याची सतत मनाला खात्री देत असल्याने कधीही निराशा झाली नाही. एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळेल अशी मनात खोलवर भावना होती अशी प्रतिक्रिया बाबा यांची होती.

बाबा जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हा ते आपल्या भाचा व भाचीला कडकडून भेटले. या दोघांना त्यांनी पहिल्यांदा पाहिले होते. हा क्षण माझ्यासाठी एकाच वेळी सुखाचा व दुःखाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांची होती.

बाबा घरी येणार म्हणून आसपासचे अनेक नागरिक जमा झाले होते. पण त्यामध्ये त्यांचे वडील नव्हते. २०१७मध्ये त्यांच्या वडिलांचे गुलाम नबी बाबा यांचे निधन झाले होते. आपला मुलगा आयुष्यभर तुरुंगात खितपत पडेल अशी त्यांनी हाय खाल्ली होती.

बाबा तुरुंगात असल्याने त्यांच्या घराची जबाबदारी त्यांचा धाकटा भाऊ नजीर याच्यावर पडली. शिवाय त्यांच्या दोन बहिणींची लग्ने गेल्या ११ वर्षांत झाली आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0