काबुल विद्यापीठात दहशतवादी हल्ला, २५ ठार

काबुल विद्यापीठात दहशतवादी हल्ला, २५ ठार

काबुलः अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या काबुल विद्यापीठात तीन अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ हून अधिक विद्यार्थी ठार तर २२ जण जखमी झाले. हा ह

तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम
अफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’
काबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार

काबुलः अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या काबुल विद्यापीठात तीन अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ हून अधिक विद्यार्थी ठार तर २२ जण जखमी झाले. हा हल्ला सोमवारी झाला. या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण काबूल विद्यापीठाला वेढा घातला होता. रस्ते सील केले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तालिबान संघटनेने मात्र आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

सोमवारी काबुल विद्यापीठात इराणी पुस्तकांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी इराणमधून ४० अभ्यासक आले होते. तसेच काही वर्ग सुरू होते. विद्यालय सुरू असताना हे तीन दहशतवादी घुसले व त्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या या हल्लाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये घबराट उडाली ते सैरावैरा पळू लागले. काहींनी भिंतीवरून उड्या मारून आपले प्राण वाचवले. तर विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले.

दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू झाल्यानंतर काही काळानंतर एका दहशतवाद्याने स्वतःला उडवून दिले.

गेल्या वर्षीही काबुल विद्यापीठावर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात ८ जण ठार झाले होते. २०१६मध्ये काबुलमधील अमेरिकी विद्यापीठामध्येही दहशतवादी घुसले होते व त्यांनी १३ जणांना ठार मारले होते.

तर गेल्या महिन्यात आयसीसने शिया बहुल दश्त-ए-बार्ची या शिक्षणकेंद्रावर हल्ला करून २४ विद्यार्थ्यांना ठार मारले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: