नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असला तरी असा कायदा करण्यामागचा तर्क लक्षात येत नाही, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी बांग
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असला तरी असा कायदा करण्यामागचा तर्क लक्षात येत नाही, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले होते. या वक्तव्यानंतर अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी अफगाणिस्तानात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना भारताने बरोबरीची वागणूक दिली पाहिजे, असे विधान केले आहे. ‘द हिंदू’शी बोलताना करझाई यांनी अफगाणिस्तानातील सर्वच धर्मांची जनता दहशतवादाला बळी पडली असून तेथे मुस्लिम, हिंदू, शीख असा भेदभाव करता येणार नाही असे स्पष्ट केले. आमचा देश प्रदीर्घ काळ युद्ध व दहशतवादात होरपळून गेला आहे व ती परिस्थिती आजही कायम आहे. अशा या देशात हिंदू व शीख अल्पसंख्याकांना झळ बसली आहे असे म्हणता येणार नाही, तेथे मुस्लिमही तितकेच होरपळले आहेत. त्यामुळे भारतातील मुसलमानांमध्ये अफगाणिस्तानातील मुसलमानांविषयी नक्कीच कणव असावी, असे ते म्हणाले.
करझाई यांनी ते अफगाणिस्तानचे अध्यक्ष असतानाचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, भारतात आता बाहेरील देशांविषयी जी धारणा आहे, त्यापेक्षा उलट धारणा अफगाणिस्तानात आहे. एका कार्यक्रमात माझ्या अनेक वर्षे ओळखीतले ९० वर्षांचे एक गृहस्थ मला भेटायला आहे. ते पूर्वी शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी मला, ‘अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत आपल्या हिंदू व शीख बांधवांची मोठ्या प्रमाणात परवड झाली आहे. त्यामुळे ते हा देश सोडून गेले आहेत. पण या देशावर त्यांचा हक्क असून तुम्ही या सर्व लोकांना पुन्हा बोलावून घ्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे,’ अशी विनंती केली. अफगाणिस्तानात जर भारतीयांविषयी अशी भावना असेल तर भारताने अफगाणिस्तानातून येथे आलेल्या निर्वासितांच्या हिताचे रक्षण करावे असा सल्ला त्यांनी दिला.
भारतात सरकारी आकडेवारीनुसार अफगाणिस्तानातील १८ हजाराहून अधिक निर्वासित आहेत. त्यामध्ये हिंदू व शीख धर्मियांची संख्या अधिक आहे.
मूळ बातमी
COMMENTS