आरोग्य विभागाच्या परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये

आरोग्य विभागाच्या परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये

मुंबईः गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या भरती परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार २४ ऑक्टोबर रोजी गट क ची परीक्षा तर

१०वी-१२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
१२वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय
वयोमर्यादा ओलांडलेल्यांना स्पर्धा परीक्षेची एक संधी

मुंबईः गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या भरती परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार २४ ऑक्टोबर रोजी गट क ची परीक्षा तर ३१ ऑक्टोबर रोजी गट ड ची परीक्षा होणार आहे. सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २,७३९ आणि गट ड संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा रविवारी असल्यामुळे शाळाही उपलब्ध होणार आहेत. परीक्षेच्या ९ दिवस आधी उमेदवारांना हॉलतिकीट मिळणार आहेत.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी केली. परीक्षार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला किंवा असा कोणताही प्रकार आढळला तर तत्काळ एफआयआर दाखल करण्यात यायला हवा, असेही ते म्हणाले.
न्यासा संस्था आरोग्य विभागाने नियुक्त केली नव्हती. कोणत्याही भरती परीक्षेच्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा अवलंब होतो. त्यासाठी आयटी विभाग एजन्सी निवड करते. त्या पाच एजन्सींपैकी एकाला काम दिले जाते. याबाबतचा निर्णय माहिती तंत्रज्ञान विभाग घेते. आरोग्य विभाग केवळ परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करते, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0