नवी दिल्ली : कोणताही भेदभाव न पाळता कोरोना बाधितांना मदत करावी व या आपत्तीच्या काळात संघटनेचे काम सुरूच ठेवावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्
नवी दिल्ली : कोणताही भेदभाव न पाळता कोरोना बाधितांना मदत करावी व या आपत्तीच्या काळात संघटनेचे काम सुरूच ठेवावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी संघ स्वयंसेवकाने उद्देशून केले. स्वयंसेवकांशी ऑनलाइन द्वारे संवाद साधताना भागवत यांनी सध्याच्या काळात संघ स्वयंसेवक कार्यरत असून ते मदतकार्यात सहकार्य करत असल्याचेही सांगितले.
या आपत्तीच्या काळात कुणाकडून काही चूक झाल्यास त्यासाठी सर्वांना जबाबदार, गुन्हेगार ठरवता येणे योग्य ठरणार नाही. आपण सर्वांना या काळात संयम व काळजी बाळगण्याची गरज आहे. कुठेही भय वा संताप दिसता कामा नये. सरकारने दिलेल्या सर्व निर्देशांचे प्रत्येकाने पालन करावे असे भागवत स्वयंसेवकांना उद्देशून म्हणाले.
भागवत यांनी ट्टिवरवर लिहिलेल्या संदेशात म्हटलेय की, ‘समाजसेवा कोणताही भेदभाव न पाळता सर्वांसाठी केली पाहिजे. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे ते सर्व आपले आहेत, त्यांच्यामध्ये व आपल्यात अंतर ठेवता कामा नये, आपल्याच लोकांची सेवा करणे हे उपकार नाहीत तर ते कर्तव्य आहे.’
कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती सरकारकडून योग्यरितीने सांभाळली जात असून जनताही या परिस्थितीत सहकार्य देत आहेत. अशा काळात काही घटक या वेळेचा गैरफायदा घेऊ शकतात, असाही इशारा भागवतांनी दिला.
मूळ बातमी
COMMENTS