फडणवीसांकडे गृह, लोढांकडे महिला बालविकास; बंडखोर गटाकडे कमी महत्त्वाची खाती

फडणवीसांकडे गृह, लोढांकडे महिला बालविकास; बंडखोर गटाकडे कमी महत्त्वाची खाती

मुंबई:  एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना गट व भाजपने रविवारी अखेर खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपावर नजर टाकल्यास फडणवीस यांच्या भाजपचा मंत्रिमंडळावर कब्जा झालेला दिसून आला आहे. शिंदे गटाकडे कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. वास्तविक शिंदे गटाने शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. पण भाजपने युती सरकारमध्ये जसा आपला वरचष्मा ठेवला होता, तसेच महत्त्वाची खाती आपल्या ताब्यात घेतली आहेत. शिवसेना-भाजप सरकारमध्ये गृहखाते त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते, तेच खाते फडणवीस यांनी नव्या सत्तासमीकरणात आपल्या हातात ठेवले आहे. मुख्यमंत्री हे पद जरी शक्तीशाली वाटत असले तरी भाजपने आपल्या हातात राज्याची संपूर्ण कायदा-सुव्यवस्था, महसूल यंत्रणा, अर्थ, जलसंपदा, ऊर्जा यासाऱखी महत्त्वाची खाती ताब्यात घेऊन शिंदे गटावर दबाव कायम ठेवल्याचे स्पष्टपणे दिसून येते. राजकीय दृष्टिकोनातून विचार करता शिंदे गटावर सर्वतोपरी अंकुश राहील अशीच रचना मंत्रिमंडळ खातेवाटपातून दिसून येत आहे.

महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात महिला समस्यांवर आजपर्यंत कोणतेही काम न केलेल्या व सामाजिक दृष्टिकोनाची वानवा असलेल्या मुंबईतल्या एका बड्या बिल्डरला म्हणजे मंगलप्रभात लोढा यांच्याक़डे राज्याचे महिला व बालविकास हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. शिंदे गटा तीन शिवसेना आमदार सामील असूनही त्यांची बोळवण केलेली आहे. या मंत्रिमंडळात एकही महिला नाही हेही विशेष.

खातेवाटप खालीलप्रमाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, गर विकास, माहिती व तंत्रज्ञानमाहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहवित्त व नियोजन, विधी व न्यायजलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर शनिवारी हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूलपशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-वनेसांस्कृतिक कार्यव मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षणवस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राजवैद्यकीय शिक्षणक्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-कामगार

 संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 उदय सामंत-उद्योग,

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण –सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार-कृषी

दीपक केसरकर-शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे- सहकारइतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- पर्यटनकौशल्य विकास व  उद्योजकतामहिला व बालविकास

COMMENTS