देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी

मुंबई : महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज शप

कोरोना आणि राजकारण
महाराष्ट्र भरती परीक्षाः लेखा परीक्षणातही विसंगती
फडणविसांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध – मलिक

मुंबई : महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. नव्या सरकारला येत्या शनिवारी २ जुलैला विश्वास ठराव मांडण्याचा आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला.

आज संध्याकाळी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पदाची शपथ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर शनिवारी २ जुलैला विश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी गेले काही दिवस शिंदे यांच्या बंडाच्या मागे राहून सूत्रे फिरवल्याची चर्चा होती.  फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले होते. मात्र दुपारी फडणवीस आणि शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले.

शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी केली होती. नव्या सरकारमध्ये खुद्ध फडणवीस सामील असणार नाहीत, असे फडणवीस यनीच जाहीर केले होते. आणि राजभवनात फक्त शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात येणार होती.

मात्र भाजप केंद्रीय नेतृत्त्वाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घेण्याचे आदेश दिल्याने, त्यांना पदाची शपथ घ्यावी लागली.

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले, “भाजपा अध्यक्ष जे. पी. नढ्ढाजी यांच्या सांगण्यावरून, देवेंद्र फडणवीसजी यांनी मोठ्या मनाने आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

त्यानंतर फडणवीस यांनी ट्विट केले, की एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0