नवी दिल्लीः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कौन्सिलने (आयसीएमआर) कोविड संबंधित रॅपिड अँटिजन चाचणीच्या घरात चाचणी करणार्या कीटला परवानगी दिली आहे. ज्या व
नवी दिल्लीः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कौन्सिलने (आयसीएमआर) कोविड संबंधित रॅपिड अँटिजन चाचणीच्या घरात चाचणी करणार्या कीटला परवानगी दिली आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील किंवा ज्या व्यक्तींचा प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांवर या कीटद्वारे चाचणी केली जावी, असेही आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.
हे रॅपिड अँटिजीन कीट पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीने तयार केले आहे. रॅपिड अँटिजन चाचणीसाठी नाकातील स्वाब घेतला जातो आणि या कीटमधील अंतर्भूत पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे चाचणी घ्यावी असे निर्देश आयसीएमआरने दिले आहेत.
या कीटचा वापर स्वैर टाळावा. या कीटच्या चाचणीत एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास ती कोविड पॉझिटिव्ह मानली जाते आणि तिची पुन्हा चाचणी करावी लागत नाही, असे आयसीएमआरचे म्हणणे आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, किंवा एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली असेल (जिचा प्रयोगशाळेतील निकाल पॉझिटिव्ह आला असेल) तिची या होम किटद्वारे चाचणी करावी असे आयसीएमआरने सांगितले आहे.
आयसीएमआरने या कीटबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. त्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीची रॅपिड अँटिजिन टेस्ट निगेटिव्ह आली असेल तर त्या व्यक्तीची आरटी-पीसीआरही टेस्टही घेणे अत्यावश्यक आहे.
मूळ बातमी
COMMENTS