‘लॉकडाउनमुळे २०-२५टक्केच संसर्ग रोखला जाईल’

‘लॉकडाउनमुळे २०-२५टक्केच संसर्ग रोखला जाईल’

नवी दिल्ली : २४ मार्च २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सुमारे एक आठवड्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर

संकटग्रस्त ग्रेट अंदमान जातीलाही कोरोना लागण
जगात कोरोनाचे ६ कोटीहून अधिक रुग्ण
‘तबलिगींसारखी परिस्थिती दिल्लीच्या वेशीवर होईल का?’

नवी दिल्ली : २४ मार्च २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सुमारे एक आठवड्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) लॉकडाऊन पुकारल्याचा परिणाम मर्यादित राहणार असून त्याने कोरोनाची साथ २० ते २५ टक्केच रोखली जाईल.  लॉकडाउन हा तात्पुरता पर्याय आहे त्याशिवाय सरकारने वैद्यकीय उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे, असे सरकारच्या  निदर्शनास आणून दिले होते.

आयसीएमआरचा हा अंतर्गत निरीक्षण अहवाल साथरोगतज्ज्ञ, डॉक्टर व अन्य वैद्यकीय तज्ज्ञांच्या चर्चेतून आला होता. आणि त्याचे सादरीकरण सरकारला दाखवण्यात आले होते. हा निरीक्षणात्मक अहवाल सार्वजनिक झाला नव्हता, पण कोरोनाचा संसर्ग लॉकडाऊनमुळे पूर्णपणे आटोक्यात येणार नाही, ही साथ येत्या काही दिवसांत पसरत जाईल असे सरकारचे साथरोगतज्ज्ञ सल्लागार विनोद के पॉल यांचे म्हणणे होते, अशी या संदर्भातील माहिती ‘आर्टिकल-१४’ ने प्रसिद्ध केली आहे.

या अहवालातील निरीक्षणांनुसार कोरोना संसर्ग पुढे वर्षभर राहणार असून योग्य वैद्यकीय उपाययोजना हाती नसल्यास लॉकडाउन मागे घेतल्यानंतर पुन्हा साथ पसरण्याची भीती आहे. सध्या पुकारलेल्या लॉकडाउनमुळे ज्यांना आधीच कोरोना झाला आहे, त्यांची संख्या कमी होणार नाही पण ही साथ झपाट्याने पसरणार नाही मात्र ती थांबेल असेही नाही. लॉकडाऊन पुकारल्यानंतर लगेचच ४० टक्के साथीवर नियंत्रण आले पण याचा परिणाम अंतिम आकडेवारीवर फारसा दिसून येणार नाही, असे या सादरीकरणात नमूद करण्यात आले आहे.

लॉकडाऊन पुकारल्याने सरकारला आरोग्य व्यवस्था उभी करण्यास वेळ मिळाला, रुग्णालये सज्ज झाली, विलगीकरण कक्ष तयार झाले, चाचणी केंद्र सुरू करण्यात आली, त्याचबरोबर काही औषधांचे संशोधनही सुरू झाले. आपल्या सादरीकरणात डॉ. पॉल यांनी वेगाने वैद्यकीय सोयीसुविधा उभी करावीत असेही आवाहन सरकारला केले. एका विभागात ५०० कोरोनाबाधित रुग्ण असतील तर तेथे १५० व्हेंटिलेटर, ३०० आयसी बेड व १२००-१६०० जनरल बेडची गरज लागेल असे त्यांनी सरकारला सांगितले.

‘आर्टिकल-१४’ मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी नितीन सेठी व कुमार संभव श्रीवास्तव या दोन पत्रकारांची आहे. या दोघांनी आयसीएमआरमधील सदस्य, आरोग्य खाते व पॉल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रतिसाद मिळाले नाहीत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: