आयआयटी दिल्ली, जामिया, आयएमएचा परवाना रद्द

आयआयटी दिल्ली, जामिया, आयएमएचा परवाना रद्द

नवी दिल्लीः आयआयटी दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल  असोसिएशन (आयएमए), ऑक्सफॅम इंडिया यांच्या सहित देशातल्या सुमारे ६००० संस्थांचा परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. या संस्थांना परदेशातून आर्थिक मदत मिळते व त्यांच्या नोंदणीकरणाची मर्यादा संपल्यामुळे त्यांच्यावर एफसीआरए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परदेशातून आर्थिक मदत घेण्यासाठी संस्थांची नोंदणी व दरवर्षी नूतनीकरणही आवश्यक असते. या ६००० हून अधिक संस्थांनी नूतनीकरणाचे अर्जही पाठवले नसल्याने त्यांचा परवाना रद्द केल्याचे केंद्रीय गृह खात्याचे म्हणणे आहे.

ज्या ६००० संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यातील काही प्रमुख संस्थांची नावे पुढील प्रमाणेः इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, भारतीय लोक प्रशासन संस्थान, लाल बहादुर शास्त्री मेमोरियल फाउंडेशन, लेडी श्रीराम कॉलेज फॉर वीमेन, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ऑक्सफैम इंडिया, तहलका इंडिया, ऑक्सफॅम इंडिया, जामिया मिलिया इस्लामिया, टाइम्स ऑफ इंडिया रिलीफ फंड, टाइम्स फाउंडेशन, विश्व धर्मायतन (चंद्रस्वामी द्वारा स्थापन), महर्षि आयुर्वेद प्रतिष्ठान, इस्लामिक कल्चरल सेंटर, नेहरू स्मारक संग्रहालय आणि पुस्तक संग्रहालय, आयआयटी दिल्ली, भारतीय प्रेस संस्था, दिल्ली पब्लिक स्कूल सोसायटी, जेएनयूचे अणुविज्ञान केंद्र, इंडिया हॅबिटेट सेंटर, अशा संस्थांचा समावेश आहे.

या संस्थांना नूतनीकरणाची तारीख ३१ डिसेंबर २०२१ दिली होती. ही तारीख तिसऱ्यांदा वाढवून देण्यात आली होती. पण ही मर्यादाही या संस्थांनी न पाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे केंद्रीय गृहखात्याचे म्हणणे आहे.

मूळ वृत्त

COMMENTS