नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्गाटन

नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्गाटन

बीड: नवीन आष्टी - अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां

बिहारमध्ये रेल्वे परीक्षा उमेदवारांचे आंदोलन चिघळले
मुंबई -हैद्राबाद, पुणे- औरंगाबाद हायस्पीड रेल्वेः मोदींना पत्र
मेळघाटात ब्रॉड गेज रेल्वे मार्गामुळे वाघांना धोका

बीड: नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर शासन भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अहमदनगर-बीड -परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी-अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते.

नवीन आष्टी – अहमदनगर नवीन मार्गाविषयी…

  • ६६ किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाइन हा अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ कि. मी. नवीन ब्रॉडगेज लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समसमान म्हणजे प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे.
  • डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना सुलभ ठरेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.
  • डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि दुपारी १.५५ वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता आठवड्यात दररोज धावणार आहे.
  • ही गाडी कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0