‘कोविशिल्ड’ व ‘कोवॅक्सिन’ लसीच्या वापरास मंजुरी

‘कोविशिल्ड’ व ‘कोवॅक्सिन’ लसीच्या वापरास मंजुरी

नवी दिल्लीः सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने रविवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ व भारत बायोटेकच्या स्वद

‘भारत बायोटेक’चा नवा प्लॅन्ट पुण्यात
तेलंगणमधील न्यायालयाच्या निर्णयावर ‘द वायर’चा खुलासा
लसीकरणामधेही ‘शुद्ध देसी रोमान्स’

नवी दिल्लीः सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने रविवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ व भारत बायोटेकच्या स्वदेशी निर्मित ‘कोवॅक्सिन’ लसीच्या आपतकालिन वापरास मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता देशभरात कोविड-१९ विरोधी लसीकरण मोहिमेला वेग येईल.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी अस्ट्राझेनेका व ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या ‘कोविशील्ड’ या कोरोना विषाणूवरील लसीला व शनिवारी भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या कोरोनावरील लसीला आपातकालिन वापरासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर रविवारी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. व्ही. जी सोमानी पत्रकार परिषदेत तज्ज्ञ समितीच्या दोन्ही लसीच्या शिफारशींला मंजुरी दिल्याचा निर्णय संस्थेने घेतल्याचे सांगितले. आता भारतात सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून कोविड-१९ लसीचे उत्पादन केले जाणार आहे व जनतेला कोविड-१९च्या दोन लसी उपलब्ध होणार आहेत.

पण भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला मान्यता देण्यावरून काँग्रेस नेते शशी थरूर व जयराम रमेश यांनी सरकारवर निशाणा साधला. कोवॅक्सिन लसीला मान्यता दिली असली तरी त्यात आंतरराष्ट्रीय मानके व प्रक्रियांना धाब्यावर बसवले असून क्लिनिक ट्रायलचा तिसरा टप्पाही या लसीने पार केलेला नसल्याचा आरोप या दोन नेत्यांनी सरकारवर केला. त्यानंतर एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी कोवॅक्सिन लसीला आपतकालिन परिस्थितीत वापरली जाणार असल्याचे स्पष्ट केले. ती कोविशील्डसारखी देशव्यापी देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने मंजुरी जाहीर केल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी सर्व देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत, संस्थेने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगितले. कोविशील्ड ही कोरोनावरील प्रभावी लस ठरेल व लसीकरण मोहीम लवकरच सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनीही कोविडमुक्त भारत मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी देशातील वैज्ञानिकांनी दाखवलेले इच्छाशक्तीचे त्यांनी कौतुक केले.

‘कोवॅक्सिन’ लस ही स्वदेशी असून भारत बायोटेक व आयसीएमआरच्या सहकार्याने ती विकसित केली जात आहे.

तर ‘कोविशील्ड’ ही लस अस्ट्राझेनेका व ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने विकसित केली आहे.  कोविडशील्डचे उत्पादन भारतातल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून केले जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटला काही अटीशर्तींसहित आपातकालीन परिस्थितीत लस वापरण्यास मंजुरी द्यावी अशी तज्ज्ञ समितीने शिफारस केली होती.

तर भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ लस क्लिनिकल ट्रायलमध्ये असल्याने व कोरोना विषाणूमध्ये बदल होत असल्याने ही लस आपातकालिन परिस्थितीमध्ये द्यावी असे तज्ज्ञ समितीचे मत होते.

रविवारी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने अहमदाबादस्थित झायडस कॅडिला हेल्थ केअर कंपनीच्या ‘झायकोव-डी’ या कोरोनावरील लसीच्या तिसर्या टप्प्यासाठीच्या वापराला मंजुरी दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0