‘देश आर्थिक मंदीत’

‘देश आर्थिक मंदीत’

मुंबईः चालू आर्थिक वर्षांतील दुसरी तिमाहीतील (जुलै ते सप्टेंबर) देशाचा जीडीपी गेल्या वर्षाच्या तुलनेत ८.६ टक्क्याने कमी येईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेत

एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन
भारत सध्या सर्वांत मोठ्या संकटात : राजन
९ शहरांमध्ये घरांची विक्री ९.५ टक्क्याने घटली

मुंबईः चालू आर्थिक वर्षांतील दुसरी तिमाहीतील (जुलै ते सप्टेंबर) देशाचा जीडीपी गेल्या वर्षाच्या तुलनेत ८.६ टक्क्याने कमी येईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेतील संशोधक पंकज कुमार यांनी आपल्या अहवालात नमूद केला आहे. चालू वित्तीय वर्षांत सलग दोन तिमाहीतील जीडीपीमध्ये ऋणात्मक वृद्धी आल्याने अर्थव्यवस्थेत मंदी येते, असे अर्थशास्त्रात सांगितले जाते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीतील घट २३.९ टक्क्याने झाली होती. त्यानंतर दुसर्या तिमाहीतही जीडीपी ८.६ टक्क्याने कमी होणार असल्याने भारत आपल्या इतिहासात पहिल्यांदा आर्थिक मंदीत गेला असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

रिझर्व्ह बँक आपल्या संस्थेतील आर्थिक घडामोडींच्या संशोधकांचे अहवाल दर महिन्याला प्रसिद्ध करत असते. पंकज कुमार यांच्या अहवालाचे शीर्षक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इंडेक्स असे असून तो बुधवारी प्रसिद्ध झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने या पूर्वी चालू वित्तीय वर्षांत दुसर्या तिमाहीत जीडीपी ९.५ टक्के घसरेल असे भाकीत वर्तवले होते.

पण लॉकडाऊन उठवल्यानंतर अर्थव्यवस्थेत आस्तेआस्ते आर्थिक आदानप्रदान सुरू झाल्याने परिस्थिती सुधारेल असेही या अहवालात म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0