स्वतंत्र मणिपूरची घोषणा करणाऱ्याला एनआयएकडून अटक

स्वतंत्र मणिपूरची घोषणा करणाऱ्याला एनआयएकडून अटक

इंफाळः दोन वर्षांपूर्वी भारतातून मणिपूर राज्य स्वतंत्र होत असल्याची घोषणा करणारा फुटीरतावादी नेता नरेंगबाम समरजीत याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवार

अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक
अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती!
बिहारमध्ये २ उपमुख्यमंत्री, पहिल्यांदाच महिलेला संधी

इंफाळः दोन वर्षांपूर्वी भारतातून मणिपूर राज्य स्वतंत्र होत असल्याची घोषणा करणारा फुटीरतावादी नेता नरेंगबाम समरजीत याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी लंडनहून इंफाळमध्ये आणले. गेल्या शुक्रवारी 26 मार्चला समरजीत याला दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेथून एनआयएने त्याला इंफाळमध्ये आणले. इंफाळमध्ये 31 मार्चपर्यंत समरजीत पोलिस कोठडीत असणार आहे.

गेल्या गुरुवारी 25 मार्चला समरजीतला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. एनआयएने समरजीतला लंडनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतात आणले होते.

समरजीतला इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मणिपूर झिंदाबाद, समरजीत झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

ऑक्टोबर 2019मध्ये लंडनमध्ये मणिपूरचे राजा लेशेंम्बा सनाजाओबा यांचे आपण प्रतिनिधी असल्याचा दावा करत याम्बेन बिरेन व नरेंगबाम समरजीत या दोन असंतुष्ट नेत्यांनी भारतातून मणिपूर स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली. बिरेन यांनी स्वत:ला ‘मणिपूर स्टेट कौन्सिलचे मुख्यमंत्रीपद’ व समरजीत यांनी स्वत:ला ‘मणिपूर स्टेट कौन्सिलचे संरक्षण व परराष्ट्रमंत्री’ म्हणून घोषित केले होते. आम्हा दोघांच्या मार्फत आता स्वतंत्र मणिपूरचा कारभार लंडन येथून हाकला जाईल असे त्यांनी घोषित केले होते.

या दोघांनी आपली पत्रकार परिषद मणिपूरचे राजा लेशेम्बा सनाजाओबा यांचा संदेश देण्याकरिता बोलावली असल्याचा दावा करत मणिपूर हे एक स्वतंत्र राष्ट्र असल्याचे सांगत या राष्ट्राला पाठिंबा देण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायापुढे केले होते. या दोघांच्या मते 30 लाख मणिपुरी जनतेला स्वत:चे वेगळे राष्ट्र हवे आहे आणि आमचे भारत सरकारशी चर्चा करण्याचे सर्व प्रयत्न संपले आहेत. भारताकडून आम्हाला नेहमीच सापत्नभावाची व द्वेषाची भावना मिळाली असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मणिपूरमध्ये आजपर्यंत झालेल्या हत्यांची १५२८ प्रकरणे निलंबित आहेत, असा दावा केला होता.

या घटनेनंतर महाराजा लेशेम्बा सनाजाओबा यांनी आपल्याला या प्रकरणाची काहीही माहिती नसल्याचा दावा केला. त्यांनी या घटनेचा निषेधही केला होता. असल्या प्रकरणात आपले नाव गोवले गेल्याबद्दल त्यांनी समाजामध्ये नकारात्मक भावना पसरल्याची चिंताही व्यक्त केली होती. त्यानंतर मणिपूरमध्ये या दोघांशिवाय अन्य तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

समरजीत यांनी स्वतंत्र मणिपूरची घोषणा केल्यानंतर लंडनमध्ये राजाश्रय मागितला होता. पण एनआयएने त्याला भारतात आणले.

समरजीत हा अवैधरित्या पैसे गोळा करत असल्याचे तपासातंर्गत दिसून आले. त्याने अनेक बेकायदा कंपन्या सुरू केल्या होत्या त्यातून वार्षिक 36 टक्के परतावा देतो असे सांगून तो पैसा गोळा करत होता, असे एनआयएचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0