भारत-अमेरिका चर्चेवर चीन नाराज

भारत-अमेरिका चर्चेवर चीन नाराज

नवी दिल्लीः भारत-चीन सीमावादात अमेरिकेने चीनच्या विरोधात भूमिका घेतल्याने चीनने बुधवारी आपली नाराजी व्यक्त केली. चीनच्या भारतातील दुतावासाने अमेरिकेचा

अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले
हाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका
इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का?

नवी दिल्लीः भारत-चीन सीमावादात अमेरिकेने चीनच्या विरोधात भूमिका घेतल्याने चीनने बुधवारी आपली नाराजी व्यक्त केली. चीनच्या भारतातील दुतावासाने अमेरिकेचा भारत-चीन संबंधांतील हस्तक्षेप हा आंतरराष्ट्रीय राजनयिक प्रक्रियेचा भंग असून चीनविरोधातला खोटा प्रचार ही अमेरिकेची जुनीच खोड असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ व संरक्षणमंत्री मार्क इस्पर हे भारताच्या दौर्यावर आले होते. या दौर्यात या दोघा मंत्र्यांनी भारताला चीनकडून असलेल्या धोक्याबद्दल चर्चा केली. भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करायची असेल व चीनला शह द्यायचा असेल तर भारत-अमेरिका मैत्री अधिक सुदृढ करावी लागेल असे मत यावेळी अमेरिकेने मांडले होते. चीनच्या वुहान प्रांतातून आलेला कोरोना, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून लोकशाहीची होणारी गळचेपी, पारदर्शकता, कायद्याचे राज्य अशा विविध मुद्द्यांवर अमेरिकेने चीनविरोधात मत व्यक्त केले. त्यावरून नाराज चीनने बुधवारी आपले स्पष्टीकरण दिले.

या स्पष्टीकरणात अमेरिकेकडून चीनविरोधातला सततचा होणारा खोटा प्रचार, चीनविरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडी ही अमेरिकेची शीतयुद्धातील जुनी रणनीती असून अशा प्रचारामुळे आंतरराष्ट्रीय राजनयिक सिद्धांतांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप चीनने केला. अमेरिका अजून शीतयुद्धाच्या कालखंडात राहात असून त्यांचा वैचारिक विरोधही असत्यावर आधारलेला आहे, अशी टीका चीनने केली. इंडो-पॅसिफिक व्यूहरचना हा अमेरिकेचा डाव असून त्यामुळे या प्रदेशात तणाव निर्माण होणार असून त्याने अकारण स्पर्धा वाढणार आहे. अमेरिकेला स्वतःचे प्रभुत्व येथे प्रस्थापित करायचे असल्याने त्यांचे प्रयत्न संघटित असल्याचेही चीनने म्हटले. सध्याच्या काळात जगातल्या सर्व देशांनी सहकार्याच्या दृष्टिकोनातून एकत्र येण्याची गरज आहे. शांततापूर्ण विकास व सहकार्य हाच पुढे जाण्याचा मार्ग जगापुढे आहे, असे चीनने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0