एप्रिल-जूनच्या जीडीपीत २०.१ टक्क्याने वृद्धी

एप्रिल-जूनच्या जीडीपीत २०.१ टक्क्याने वृद्धी

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल ते जून या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी विक्रम

जीडीपी ७.५ टक्के घसरला
१९ मूलभूत समस्या – राजकीय पक्षांना आवाहन
२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल ते जून या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी विक्रमी २०.१ टक्के इतका नोंदला गेला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत जीडीपी १८.८ टक्के होता. कोरोना महासाथीचे सावट अर्थव्यवस्थेवर असतानाही अर्थव्यवस्थेमध्ये हा सकारात्मक बदल दिसत असला तरी अर्थव्यवस्था अजून पूर्वस्थितीत आलेली नाही असेही चित्र दिसत आहे.

देशाचा जीडीपी ठरवताना २०११-१२ च्या मूलभूत किंमती लक्षात घेतल्या जातात. त्यानुसार पहिल्या तिमाहीत जीडीपी ३२.३८ लाख कोटी रु. झाला आहे. पण २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ३५.३५ लाख कोटी रु. इतका होता.

गेल्या आर्थिक वर्षात अखेरच्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्के होता. आता देशातल्या अनेक राज्यात लॉकडाऊन अंशतः उठवला असल्याने बाजारपेठांमध्ये उलाढाली वाढल्या आहेत. कर संकलनातही वाढ होताना दिसत आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बांधकाम क्षेत्राची सर्वाधिक ६८.३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर कारखाना उत्पादन क्षेत्रात ४९.६ टक्के वृद्धी दर व खाण उद्योगाने १८.६ टक्के वृद्धी दर प्राप्त केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0