मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत हास्यकलाकार कुणाल कामरा यांचे वर्तन उपद्रवी स्वरुपाचे नव्हते अशी प्रतिक्रिया गुरुवारी ज्या
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत हास्यकलाकार कुणाल कामरा यांचे वर्तन उपद्रवी स्वरुपाचे नव्हते अशी प्रतिक्रिया गुरुवारी ज्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून अर्णब व कुणाल प्रवास करत होते त्या विमानाच्या पायलटने दिली आहे. या पायलटने इंडिगो व्यवस्थापनाला एक पत्र लिहिले असून कुणाल कामरा याच्यावर सहा महिन्याची बंदी घालण्याअगोदर विमानाचा पायलट म्हणून माझ्याशी चर्चा तरी करायची असे म्हटले आहे. आपल्या व्यवस्थापनाने कुणालवर प्रवास बंदीचा घेतलेला निर्णय वेदनादायक आहे पण तो केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रियेतून घेण्यात आला आहे, असेही या पायलटने म्हटले आहे.
कुणालचे विमानातील वर्तन अयोग्य वाटत असले तरी ते नियमानुसार लेवल एक प्रकारचे नव्हते, ते उपद्रवीही नव्हते. पायलट म्हणून अशा किंवा या पेक्षा अत्यंत वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. जर व्यवस्थापनाला कामराचे वर्तन पटत नसेल तर ते त्याबाबतची व्यवस्थापनाची भूमिका मला कळू शकेल का असाही सवाल या पायलटने केला आहे.
कुणालचे रिपब्लिबन चॅनेलच्या कार्यालयाबाहेर निदर्शन
दरम्यान गुरुवारी कुणालने मुंबईतील प्रभादेवी येथील अर्णबच्या रिपब्लिकन चॅनेलच्या कार्यालयाबाहेर हातात एक पोस्टर घेऊन मी झालेल्या घटनेबद्दल माफी मागणार नाही असे जाहीर केले. कुणालने आपला फोटो ट्विटर व फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे.
COMMENTS