बायडेन यांच्या भेटीची शक्यता इराणने फेटाळली

बायडेन यांच्या भेटीची शक्यता इराणने फेटाळली

२०१५च्या अणुकराराबाबत अमेरिका सोडून अन्य सहा अरब देशांशी इराण बोलणी सुरू करेल पण अमेरिकेने इराणवरचे सर्व निर्बंध हटवले तरी अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेण्याची शक्यता इराणचे नवे अध्यक्ष इब्राहिम रैसी यांनी फेटाळली आहे.

गेल्या शुक्रवारी रैसी यांनी अध्यक्षीय निवडणुकांत विजय मिळवला होता. त्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत रैसी यांनी इराण आपल्या नजीकच्या अरब राष्ट्रांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे विधान केले. रैसी यांचा रोख सौदी अरेबियाकडे होता पण सौदीने येमेनमधील आपला हस्तक्षेप कमी केल्यास त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असे संकेत रैसी यांच्या पत्रकार परिषदेत दिसून आले.

६० वर्षांचे रैसी पाश्चिमात्य राष्ट्रांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अध्यक्षीय पदाची सूत्रे घेतल्यानंतर इराणच्या महत्त्वाकांक्षी अणुप्रकल्पाबाबत चर्चा सुरू झाली होती. अमेरिकेने इराणच्या हिताचा मुद्दा मान्य करावे व त्यांनी इराणबरोबरचा अणुशांतीकरार पुन्हा पुनर्जीवित करावा अशी रैसी यांची भूमिका आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडन आल्यानंतर गेल्या एप्रिलपासून व्हिएन्ना येथे अमेरिका व इराणमध्ये इराणच्या अणुप्रकल्पावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी २०१८मध्ये इराणवर आर्थिक निर्बंध लादले होते, त्यानंतर उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अणु प्रकल्पासाठी आवश्यक असणार्या युरेनियमच्या समृद्ध प्रकरणावरून अमेरिकेने इराणवर संशय घेत त्यांच्यासोबत केलेला करार रद्द आर्थिक निर्बंध लादले होते. इराण आपल्या अणुप्रकल्पाचा उपयोग शांततेसाठी नाही तर अण्वस्त्रे तयार करण्यासाठी करत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. पण अमेरिकेचे हे सर्व आरोप इराण सतत फेटाळत आला आहे.

ही पार्श्वभूमी पाहता रैसी यांनी इराणवरचे सर्व आर्थिक निर्बंध अमेरिकेने ताबडतोब मागे घेतले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

अमेरिकेचे उत्तर  

दरम्यान रैसी यांच्या उत्तरावर अमेरिकेच्या व्हाइट हाउसने रैसी यांच्या प्रतिक्रियेला फारसे महत्त्व न देता या बाबतचा अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनी हेच घेऊ शकतात असे उत्तर दिले आहे. रैसी यांच्या निर्णयापेक्षा खामेनी जे काही सांगतील तेच अंतिम उत्तर मानले जाते असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS