इस्रायल दुतावास स्फोटः ४ जणांना जामीन

इस्रायल दुतावास स्फोटः ४ जणांना जामीन

नवी दिल्लीः २९ जानेवारी रोजी शहरातील इस्रायल दुतावासानजीक कमी तीव्रतेच्या आयडी विस्फोटाप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले कारगीलमधील ४ विद्यार्थ्यांविरोधात

डीआरडीओतल्या शास्त्रज्ञाकडून दिल्ली कोर्टात बॉम्बस्फोट
काबुल विद्यापीठात दहशतवादी हल्ला, २५ ठार
जम्मूत लष्कराच्या हवाई तळावर ड्रोन हल्ला

नवी दिल्लीः २९ जानेवारी रोजी शहरातील इस्रायल दुतावासानजीक कमी तीव्रतेच्या आयडी विस्फोटाप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले कारगीलमधील ४ विद्यार्थ्यांविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या चार आरोपींविरोधात कोणतेही दुष्कृत्य केल्याचे पुरावे सापडले नाहीत तसेच या चारही जणांची पार्श्वभूमी वाईट असल्याचे आढळले नसल्याने त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे महानगर दंडाधिकारी डॉ. पंकज शर्मा यांनी स्पष्ट केले.

जामीन मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांची नावे नजीर हुसैन, झुल्फिकार अली, एजाज हुसैन व मुजम्मिल हुसैन अशी असून हे सर्व विद्यार्थी २० ते २९ वयोगटातील आहे. या चौघांचा एकाही दहशतवादी संघटनांशी संबंध नाही, असेही आढळून आले आहे. हे विद्यार्थी इस्रायल, अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्याविरोधात ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट करत होते, व त्यातील एका आरोपीला दुसरा आरोपी ट्विटरवर फॉलो करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण या चौघांनी भारतविरोधात कोणताही वादग्रस्त, आपत्तीजनक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला नाही, असे दिल्ली पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे. या चौघांकडील इलेक्ट्रॉनिक गॅजेट पोलिसांनी अगोदर जप्त केले आहे व त्याची चौकशीही अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण हे तरुण दहशतवादी संघटनांशी संबंधित नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

या चारही विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे वय पाहता त्यांना जामीन देणे योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

पण राष्ट्रीय तपास यंत्रणा व दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या चारही जणांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला आहे असा दावा केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0