जेम्स वेब दुर्बीण सूर्याच्या कक्षेच्या नजीक

जेम्स वेब दुर्बीण सूर्याच्या कक्षेच्या नजीक

ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी नासाकडून पाठवण्यात आलेल्या जेम्स वेब दुर्बिणीने सोमवारी सूर्याच्या कक्षेनजीक प्रवेश केला.  गेल्या महिन्यात जे

‘भारतविरोधी घोषणा दिल्याने पाकिस्तानात जा म्हणालो’
२७.११ टक्के बेरोजगारी, संघटित क्षेत्रावरही नोकर कपातीचा दबाव
तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतात महागाईः आयएमएफ

ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी नासाकडून पाठवण्यात आलेल्या जेम्स वेब दुर्बिणीने सोमवारी सूर्याच्या कक्षेनजीक प्रवेश केला.  गेल्या महिन्यात जेम्स वेब दुर्बीण सूर्याकडे झेपावली होती. गेल्या महिन्याभराच्या काळात जेम्स वेबने १५ लाख किमी इतके अंतर पार केले आहे. आता ती सूर्याच्या कक्षेनजीक इच्छित स्थळी एल-2 मध्ये पोहचली आहे.

सोमवारी जेम्स वेब दुर्बिण सूर्याच्या कक्षेच्या नजीक आल्यानंतर रॉकेटद्वारे वेब दुर्बिणीला सूर्याच्या कक्षेत सोडण्यात आले. ही दुर्बीण आता एल-2 कक्षेत फिरेल. ही कक्षा सूर्याची सर्वात मोठी कक्षा आहे. या कक्षेत राहून जेम्स वेबकडून ब्रह्मांडाच्या संदर्भातील घडामोडी, माहिती, छायाचित्रे, संदेश पृथ्वीवर पाठवले जातील. या दुर्बिणीवर ऊर्जेसाठी सौर पॅनेल असून त्यांना सूर्य प्रकाशापासून ऊर्जा मिळत राहणार आहे.

या अगोदर ३० वर्षांपूर्वी ब्रह्मांडाचा वेध घेण्यासाठी हबल दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली होती. ही दुर्बीण पृथ्वीपासून ५४७ किमी अंतरावर नेण्यात आली होती.

जेम्स वेब दुर्बीण कार्यान्वित झाल्यानंतर ती या ब्रह्मांडातल्या १०० दशलक्ष वर्षाच्या (बिग बँग) पहिल्या नवजात आकाशगंगेची माहिती पाठवण्यास सुरूवात करेल, असा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. हे विश्व १३.८ अब्ज वयाचे आहे.

जेम्स वेब दुर्बिणीकडून या विश्वातील अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचाही शोध घेईल. त्याच बरोबर मंगळ ग्रह व शनीचा चंद्र टायटनवरही संशोधन करणार आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0