पोलिस शौर्य पदकावरचे शेख अब्दुल्लांचे नाव हटवले

पोलिस शौर्य पदकावरचे शेख अब्दुल्लांचे नाव हटवले

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर पोलिस दलात शौर्य व साहसासाठी देण्यात येणाऱ्या पदकावरचे शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे चित्र काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने

बर्नी सँडर्स यांचा नेवाडामध्ये मोठा विजय
लोक, राष्ट्र आणि नागरिक : निषेधाचे शास्त्रीय निदान
‘एसटीच्या भविष्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे’

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर पोलिस दलात शौर्य व साहसासाठी देण्यात येणाऱ्या पदकावरचे शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे चित्र काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याच बरोबर शेख अब्दुल्ला यांचे नाव असलेल्या पदकाचे शेर-ए-कश्मीर हे नाव बदलून जम्मू-कश्मीर पोलिस मेडल असे ठेवण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान काश्मीरला भारतात समाविष्ट करण्यामागे शेख अब्दुल्ला यांचा मोठ्या प्रमाणात वाटा होता. शेख अब्दुल्ला हे पाकिस्तानचे जनक महंमद अली जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताविरोधात शेवटपर्यंत होते. धर्माच्या आधारावर राष्ट्र उभी राहू शकणार नाही, अशीही भूमिका अब्दुल्ला यांची होती. काश्मीरचे भारतात सामिलीकरण झाल्यानंतर शेख अब्दुल्ला जम्मू व काश्मीर राज्याचे पहिले मुख्यमंत्रीही झाले होते.

जम्मू-काश्मीरच्या गृह खात्याने या निर्णयाची माहिती जाहीर केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील सर्व पक्षांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. यामध्ये पूर्वी भाजपसोबत राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या पीडीपीचाही समावेश आहे.

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी शेख अब्दुल्ला यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की, ते सरकारने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तरी पुसले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. नॅशनल कॉन्फरन्सनेही शेख अब्दुल्ला यांचे पदकावरचे चित्र काढून टाकल्याने त्यांची इतिहासातील नोंद पुसली जाणार नाही, ते जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या मनांमध्ये कायमस्वरुपी कोरले गेले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय प्रतिकांचा प्रत्येकाला आदर आहे पण प्रशासनाचा हा निर्णय काश्मीरचा इतिहास, काश्मीरची ओळख व काश्मीरची प्रतीके मिटवण्याचा कुटील प्रयत्न असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0