अखेर काश्मीरमध्ये फोर जी इंटरनेट सेवा सुरू

अखेर काश्मीरमध्ये फोर जी इंटरनेट सेवा सुरू

नवी दिल्लीः सुमारे १८ महिन्यापासून बंद असलेली जम्मू व काश्मीरमधील फोर जी इंटरनेट सेवा शुक्रवारी मध्यरात्रीपासून बहाल करण्यात आली. ५ ऑगस्ट २०१९मध्ये जम

उन्हाळी सुट्यानंतर ‘३७० कलम’ याचिकांची सुनावणी
काश्मीरः पोलिस, प्रशासकीय सेवा उपराज्यपालांकडे
काश्मीरमध्ये नामांतराचे प्रयत्न सुरू

नवी दिल्लीः सुमारे १८ महिन्यापासून बंद असलेली जम्मू व काश्मीरमधील फोर जी इंटरनेट सेवा शुक्रवारी मध्यरात्रीपासून बहाल करण्यात आली. ५ ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यानंतर दहशतवाद उफाळून येईल अशी भीती व्यक्त करत जम्मू व काश्मीरची देशाला जोडणारी सर्व दळणवळण यंत्रणा केंद्र सरकारने बंद केली होती. त्यात सरकारने अनिश्चित कालाची संचारबंदी व इंटरनेटबंदी लागू केली होती. सरकारच्या या धोरणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर २१३ दिवसानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात काश्मीरमध्ये टुजी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. त्यावेळी काश्मीरमधील गंदेरबाल जिल्हा व जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर टुजी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती.

कोविड-१९च्या महासाथीतही केंद्राने फोर जी इंटरनेट सेवा सुरू केली नाही. इंटरनेटला वेग नसल्याने आरोग्य सेवक व कोरोना रुग्ण यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली. एवढेच नव्हे तर गेल्या १८ महिन्यात पर्यटन, स्थानिक उद्योग, कारखानदारी, व्यापारी आस्थापने, शैक्षणिक संस्था ते वृत्तपत्र उद्योग यांचे काम इंटरनेट नसल्याने ठप्प झाले होते.

गेल्या जानेवारी २०२०मध्ये अनुराधा भसीन विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने इंटरनेट हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय दिला होता. पण जम्मू व काश्मीरमधील इंटरनेट सेवा पूर्ववत व्हावी असे नमूद केले नव्हते. दीर्घकाळ इंटरनेट सेवा बंद करणे हे कायद्यात नमूद नसल्याचे मत व्यक्त केले होते. न्यायालयाने या संदर्भात तीन सदस्यीय समिती नेमून अहवाल द्यावा असे सूचवले होते. सरकारने समिती स्थापन करण्यात विलंब केला. त्याने न्यायालयाचा अवमान झाला. त्यावर केंद्राने समितीच्या दोन बैठका झाल्या व अहवाल लवकरच मिळेल असे न्यायालयाला सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0