जावडेकर म्हणतात, संपर्कसाधने नसणे ही मोठी शिक्षा

जावडेकर म्हणतात, संपर्कसाधने नसणे ही मोठी शिक्षा

नवी दिल्ली : कोणाशीही संपर्क न होणे किंवा तो करता न येणे किंवा संपर्क साधनेच नसणे ही सर्वात मोठी शिक्षा असल्याचे विधान केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या एका कार्यक्रमात गुरुवारी केले.

या कार्यक्रमातील भाषणात जावडेकरांनी ३७० कलम रद्द केल्याबद्दल मोदी सरकारची प्रशंसा केली पण काश्मीरमध्ये गेले २४ दिवस दूरसंपर्क सेवा बंद ठेवल्याबद्दल एक चकार शब्दही काढला नाही उलट संपर्क साधने नसल्याने जनतेला कशी शिक्षा भोगावी लागते याबद्दल मात्र त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘लोगों के मन में सारा पड़ा रहे, और किसी से कुछ न बोलो, इससे बड़ी सजा और क्या होती है? किसी से संपर्क न हो, किसी से बात न कर सकते हो, और आपके पास कम्यूनिकेशन का कोई साधन न हो, ये सबसे बड़े सजा है.’ असे त्यांनी विधान केले पण सध्या शिक्षा कोणाला होत आहे, याबद्दल मौन बाळगले.

गेल्या ५ ऑगस्टपासून संपूर्ण जम्मू व काश्मीरमध्ये दूरसंपर्क सेवा बंद ठेवण्यात आली असून  काही दिवसांपूर्वी लँडलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे पण इंटरनेट व मोबाईल बंद असल्याने हे राज्य जगापासून तुटलेले आहे.

COMMENTS