‘सर्वोच्च न्यायालय बारलाही घाबरू लागले!’   

‘सर्वोच्च न्यायालय बारलाही घाबरू लागले!’  

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या निरोप समारंभात भाषण करण्याची

‘एनआरसी’: अमानुष शेवटाची सुरुवात
सीएएविरोधात मध्य प्रदेश विधानसभेत प्रस्ताव मंजूर
पिगॅससद्वारे हेरगिरी केल्याचा फिनलंड सरकारचा दावा

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या निरोप समारंभात भाषण करण्याची संधी न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दवे यांनी याबद्दल सरन्यायाधीशांना पत्रही लिहिले आहे.

न्या. मिश्रा यांच्या निरोप समारंभात वारंवार आपले कनेक्शन कापले जात होते, असा आरोप दवे यांनी केला आहे. बारचे अध्यक्ष असूनही आपल्याला बोलण्याची संधी नाकारली असे त्यांनी नमूद केले आहे.

या अपमानामुळे स्वत:चा व बारचा मान राखण्यासाठी या सत्रातून बाहेर पडल्याचे दवे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आता बारलाही घाबरू लागले आहेत, या स्तरावर सर्वोच्च न्यायालय आले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

घटनाक्रम

दवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी आयोजित केलेल्या या व्हर्च्युअल समारंभात ते दुपारी १२:३० वाजता सहभागी झाले. त्यांनी अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि बारच्या अन्य वरिष्ठ सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर वेणुगोपाल यांचे भाषणही आपण ऐकले असे ते म्हणतात. त्यानंतर सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांना सरन्यायाधीशांनी बोलण्यासाठी आमंत्रित केले. जाधव यांनी भाषणात दवे यांचा उल्लेख केल्याने पुढील भाषण आपले असे ते धरून चालले होते. मात्र, सरन्यायाधीशांनी दवे यांना वगळून सरळ न्या. मिश्रा यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. आपल्याला बोलण्याची संधी नाकारण्यात आली आहे हे दवे यांना या क्षणी कळून चुकले. त्यानंतर १२:४९ ते १२:५३ या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून आपल्याला का बोलू दिले नाही अशी विचारणाही केली. रजिस्ट्रारना बघायला सांगतो, असे उत्तर महासचिवांनी दिले पण तोवर बराच उशीर झाला होता, असे दवे यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दवे लिहितात, “या महान संस्थेकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांची पूर्तता होत नाही आहे. कार्यक्रमाला आमंत्रित करून बोलण्याची संधी न देणे हा माझा अपमान आहे. मी काहीतरी अशोभनीय बोलेन अशी भीती आपल्याला वाटत असावी. मला जे बोलायचे होते ते मी लिहून ठेवले आहे. मी न्या. मिश्रा यांना एससीबीए, ईसी आणि स्वत:तर्फे शुभेच्छा देतो.”

ते पुढे लिहितात, “सर्वोच्च न्यायालय आता बारला घाबरण्याच्या पातळीवर आले आहे हे आता स्वीकारले पाहिजे. न्यायाधीश येतात आणि जातात पण आम्ही म्हणजे बार कायम येथेच असतो. या महान संस्थेची वास्तविक शक्ती आम्हीच आहोत. या प्रकारामुळे व्यक्तिगत स्तरावर मी खूपच दु:खी झालो आहे आणि डिसेंबर महिन्यात माझा एसएसबीएचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपेपर्यंत मी सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.”

दरम्यान, आपल्यापुढे आलेल्या प्रकरणांवर आपण मनापासून विचार केला आणि अत्यंत कणखरतेने निकाल दिले, असे न्या. अरुण मिश्रा मनोगतात म्हणाले. माझ्या प्रत्येक निकालाचे विश्लेषण करा पण त्याला कोणताही रंग देऊ नका, अशी विनंती त्यांनी कायदेतज्ज्ञांना केली.

न्या. मिश्रा हे एका प्रकाशाच्या झोतासारखे होते. त्यांनी प्रतिकूल काळातही कर्तव्यांचे पालन दृढतेने केले, अशा शब्दांत सरन्यायाधीश बोबडे यांनी न्या. मिश्रा यांची प्रशंसा केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: