नवी दिल्लीः भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून येत्या २७ ऑगस्टला न्यायमूर्ती यू. यू, लळीत हे सूत्रे हाती घेतील. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा क
नवी दिल्लीः भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून येत्या २७ ऑगस्टला न्यायमूर्ती यू. यू, लळीत हे सूत्रे हाती घेतील. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाल २६ ऑगस्टला संपत आहे. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. चंद्रचूड, न्या. नजीर, न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. कौल यांच्या न्यायवृंदाने सरन्यायाधीशपदी लळित यांच्याकडे सूत्रे देण्याबाबत सहमती व्यक्त केली होती. त्यानुसार लळित हे २७ ऑगस्टला सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. लळित यांचा कार्यकाल हा केवळ ७४ दिवसांचा असेल. ते ८ नोव्हेंबर २२ रोजी निवृत्त होतील. त्यानंतर भारताच्या सरन्यायाधीशपदी न्या. चंद्रचूड असतील. ते भारताचे ५० वे सरन्यायाधीश असतील. या दरम्यान न्या. इंदिरा बॅनर्जी २३ सप्टेंबरला निवृत्त होतील.
COMMENTS