राममंदिराच्या पूजऱ्यासह १६ पोलिसांना कोरोना

राममंदिराच्या पूजऱ्यासह १६ पोलिसांना कोरोना

नवी दिल्लीः येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन करणारे प्रमुख पुजारी व १६ पोलिसांना कोविड-१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पोलिस रा

बेल्लारीत कोरोनाबाधितांचे मृतदेह खड्ड्यात फेकले
युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय?
एल्गार परिषदः नवलखांचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला

नवी दिल्लीः येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन करणारे प्रमुख पुजारी व १६ पोलिसांना कोविड-१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पोलिस राम मंदिराच्या जागी तैनात करण्यात आले होते.

बुधवारीच केंद्र सरकारने लॉकडाऊन कमी करण्याच्या दृष्टीने काही सूचना राज्यांना दिल्या होत्या. या सूचनेत १ ऑगस्टपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेरही सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, चर्चासत्रे, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम घेण्यास मनाई केली होती. पण राममंदिराच्या भूमीपूजनाला खुद्द पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला मात्र नियमातून सूट देण्यात आली आहे. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर अयोध्येत साकेत कॉलेजच्या मैदानावर उतरणार आहे. ते मैदान ते राम जन्मभूमी स्थळ यावर रामायणातील प्रसंग रंगवणारी चित्रे काढण्यात आली आहेत.

दरम्यान अयोध्या जिल्हा प्रशासनाने मीडियाच्या वृत्तांकनाबाबत अनेक अटी व निर्बंध घातले आहेत. पण या धार्मिक सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगबाबत प्रशासनाने नेमक्या काय सूचना दिल्या आहेत, ते स्पष्ट झालेले नाही.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामभाविकांना कार्यक्रमाच्या स्थळी येऊ नये असे सांगितले असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन होणार असल्याने तो कार्यक्रम घरात बसून पाहावे असे आवाहन ट्रस्टच्या संयोजकांनी केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0