नवी दिल्ली : कर्नाटकात १५ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकात भाजपने १२ जागा जिंकून काॅंग्रेसला धोबीपछाड दिला. काॅंग्रेसला केवळ २ जागांवर समाधान
नवी दिल्ली : कर्नाटकात १५ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकात भाजपने १२ जागा जिंकून काॅंग्रेसला धोबीपछाड दिला. काॅंग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. पण भाजपच्या या यशामुळे येडियुरप्पा यांच्या सरकारचा पाया भक्कम झाला आहे. या सरकारकडे पूर्ण बहुमत आले असून येडियुरप्पा यांच्या सरकारपुढील अस्थिर राजकीय संकट तूर्त दूर झाले आहे.
कांॅग्रेसने आपला दारुण पराभव झाल्याची कबुली दिली जनतेने पक्षबदलणार्या उमेदवारांना पसंती दिली असल्याची प्रतिक्रिया काॅंग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनी दिली आहे. कांॅग्रेसला केवळ शिवाजीनगर व हुनासुरू येथील जागा जिंकता आल्या.
COMMENTS