कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाची सुनावणी आज होणार

कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाची सुनावणी आज होणार

नवी दिल्लीः हिजाब घालणाऱ्या विद्यार्थीनींना वर्गात प्रवेशबंदी घातल्याच्या एका महाविद्यालयाच्या निर्णयाचा विषय तीन सदस्यीय पीठाकडे पाठवण्याचा निर्णय बु

हिंदू राष्ट्राचे अंतिम ध्येय दृष्टिक्षेपात!
राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण
सत्यपाल सिंह यांचे डार्विनला पुन्हा आव्हान

नवी दिल्लीः हिजाब घालणाऱ्या विद्यार्थीनींना वर्गात प्रवेशबंदी घातल्याच्या एका महाविद्यालयाच्या निर्णयाचा विषय तीन सदस्यीय पीठाकडे पाठवण्याचा निर्णय बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. कृष्णा एस. दीक्षित यांनी घेतला. हिजाब घालण्याचे प्रकरण हे मोठ्या पीठाकडे देण्यामागे या विषयावर व्यापक भूमिका न्यायालयाकडून घेता यावी म्हणून आपण हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करत असल्याचे न्या. दीक्षित यांनी म्हटले. त्यामुळे गुरुवारी या विषयावर कर्नाटक उच्च न्यायालयात मोठ्या पीठापुढे सुनावणी होणार आहे.

कर्नाटकात उडुपी येथील एका महाविद्यालयाने मुस्लिम विद्यार्थ्यांनींना त्या हिजाब घालतात म्हणून वर्गबंदी केली होती. महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात ५ मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर मुलींची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ संजय हेगडे यांनी असे बंदीचे निर्णय घेऊन मुलींना शिक्षणास अटकाव केला जाऊ नये अशी आमची अपेक्षा असल्याचे न्यायालयाला सांगितले. या मुलींच्या शैक्षणिक वर्षांचे केवळ दोन महिने शिल्लक आहेत. अशा काळात एखाद्याला शिक्षणास अटकाव करणे अयोग्य असून या प्रकरणात शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्याच बरोबर महाविद्यालयात घटनात्मक अधिकारांचे संरक्षण होण्याची गरज आहे, दोन महिन्यात कोणतेही आभाळ कोसळत नाही, असे हेगडे म्हणाले.

दरम्यान महाविद्यालयात हिजाब बंदी वरून कर्नाटकात उडुपी व्यतिरिक्त शिवमोगा व बागलकोट येथील काही महाविद्यालयांमध्ये तणाव दिसून आला. राज्यात तीन दिवस महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने घेतला होता, त्याच बरोबर सरकारने शाळा, महाविद्यालयांच्या २०० मीटरच्या परिसरात कोणतेही निदर्शने व जमावास बंदी घातली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0