बेल्लारीत कोरोनाबाधितांचे मृतदेह खड्ड्यात फेकले

बेल्लारीत कोरोनाबाधितांचे मृतदेह खड्ड्यात फेकले

बंगळुरूः बेल्लारी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह आरोग्यसेवकांकडून एका खड्ड्यात टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संतापाच्य

सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवण्याला पर्याय नाही: डॉ. मुलीयील
निरागसता उध्वस्त होण्याआधी..
मार्गदर्शक तत्वे असूनही सरकारचे तबलिगवर निशाणे

बंगळुरूः बेल्लारी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह आरोग्यसेवकांकडून एका खड्ड्यात टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी संबंधित आरोग्य सेवकांना निलंबित केले असून या पुढे मृतांची विल्हेवाट लावण्याची जी मार्गदर्शक तत्वे सरकारने जारी केली आहेत, त्यांचे सक्त पालन करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीमालू यांनी दिले आहेत.

हा व्हिडिओ ज्या व्यक्तीने यू ट्यूबवर प्रसिद्ध केला आहे, त्याने घडलेली घटना बेल्लारीतली असल्याचा दावा केला आहे. काही आरोग्यसेवक पीपीई कीट घालून काळ्या प्लॅस्टिकमध्ये बांधलेले अनेक मृतदेह उचलून एका मोठ्या खड्यात टाकत असून तो खड्डा नंतर अर्थमूव्हरने बुजवला जात असल्याचे या व्हिडिओतले दृश्य आहे.

या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने दावा केला की, आठ मृतदेह खड्ड्यात टाकण्यात आले.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या आरोग्यसेवकांचे मृतदेहांशी असलेले वर्तन अमानवीय व वेदनादायक असल्याचे ते म्हणाले.

येडियुरप्पा यांनी कोरोनाने बाधित मृतांवर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार केले जावेत, मानवतेपेक्षा अन्य कोणताही धर्म सर्वश्रेष्ठ नाही असेही ट्विट केले आहे.

बेल्लारीचे उपायुक्त एस. एस. नकुल यांनीही आपण हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्याचे सांगितले. या प्रकरणी सरकारी कर्मचार्यांकडून जे वर्तन झाले ते मान खाली घालायला लावणारे असून  मृतांच्या कुटुंबियांची मी माफी मागत असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेला जबाबदार असणार्या सर्व पथकाला निलंबित करून तेथे नवे पथक आणल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0