७ महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सोशल मीडिया बंदी मागे

७ महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सोशल मीडिया बंदी मागे

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० व ३५ ‘अ’ कलम रद्द केल्यानंतर ७ महिने सुरू असलेली सोशल मीडियावरची बंदी जम्मू व काश्मीर प्र

अनाथांच्या १ टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवली
न्यूझीलंडः जेसिंदा अर्देन यांच्या लेबर पार्टीला बहुमत
एनआरसीवरून मोदींनी घुमजाव का केले?

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० व ३५ ‘अ’ कलम रद्द केल्यानंतर ७ महिने सुरू असलेली सोशल मीडियावरची बंदी जम्मू व काश्मीर प्रशासनाने बुधवारी मागे घेतली. त्याचबरोबर येत्या १७ मार्चपर्यंत टुजी सेवा व फिक्स्ड लाइन इंटरनेटवरून सर्व वेबसाइट पाहण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्या अगोदर वेबसाइटची एक यादी जाहीर केली होती. त्यात सोशल मीडिया व व्हॉट्सअप, टेलिग्राम, यासारख्या अनेक साइटवर बंदी घालण्यात आली होती. पण आता त्याच यादीतल्या वेबसाइट पाहता येणार आहेत. पण ही कालमर्यादा सरकारकडून परिस्थितीनुरुप ठरवली जाणार आहे.

पण ज्यांच्याकडे प्रीपेड मोबाइल सीमकार्ड आहे त्यांना आपली ओळख पटवून टुजी सेवा वापरावी लागेल. पोस्टपेड ग्राहकांसाठी मात्र हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. ज्यांच्याकडे फिक्स्ड लाइन इंटरनेट सेवा आहे, त्यांना इंटरनेट सेवा मॅक बायडिंगसोबत मिळेल असे प्रशासनाने म्हटले आहे. मॅक बायडिंगसाठी खास इंटरनेट प्रोटोकॉल अड्रेस घ्यावा लागतो.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0