काश्मीरमध्ये हिंदू शिक्षिकेची दहशतवाद्यांकडून हत्या

काश्मीरमध्ये हिंदू शिक्षिकेची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगरः जम्मू व काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातल्या गोपालपोरा गावात मंगळवारी दहशतवाद्यांनी रजनी बाला (३६) या महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली. र

‘भाजपच खरी ‘टुकडे-टुकडे गँग’
काश्मीरमध्ये तुर्की व इराणच्या वाहिन्यांवर बंदी
काँग्रेसला बूस्टर डोस

श्रीनगरः जम्मू व काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातल्या गोपालपोरा गावात मंगळवारी दहशतवाद्यांनी रजनी बाला (३६) या महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली. रजनी बाला गोपालपोरा येथे एका सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

गेल्या महिन्यात बडगाम जिल्ह्यात १२ मे रोजी राहुल भट या काश्मीर पंडित तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसून हत्या केली होती, त्यानंतरची काश्मीर पंडिताची हत्या करण्याची ही एक आणखी दुर्दैवी घटना आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे. पण या घटनेनंतर काश्मीर पंडितांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यात काश्मीर खोऱ्यात १३ काश्मीर पंडितांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत.

रजनी बाला या मूळच्या जम्मू प्रांतातल्या सांब जिल्ह्यातल्या असून त्या नोकरीसाठी द. काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या, त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्या मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रजनी बाला यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील राजकीय प्रतिक्रिया तीव्र झाल्या असून काश्मीरात दहशतवाद थांबला असल्याचा भाजपचा प्रचार खोटा असल्याचा आरोप पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. काश्मीरमध्ये सामान्य माणसाचे जीवन असुरक्षित आहे, पण सरकार दहशतवाद संपला असल्याचे खोटे दावे करत असून हे चिंतेचे कारण असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

तर नॅशनल क़ॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी निष्पाप सामान्य नागरिकांच्या हत्या झाल्याच्या मोठ्या यादीत या नव्या हल्ल्याची नोंद झाली असून घटनेचा निषेध व्यक्त करणे वा शोक व्यक्त करणे हे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पोकळ आश्वासनासारखे आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत काहीच अर्थ उरत नाही. रजनीच्या आत्म्याला शांती लाभो अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0